#शाहरुख खान

Showing of 235 - 248 from 255 results
बॉलिवूडमध्ये जोड्यांची 'दबंग'गिरी

बातम्याMar 26, 2011

बॉलिवूडमध्ये जोड्यांची 'दबंग'गिरी

26 मार्चकतरिना कैफ आणि शाहरुख खान हे दोघेही आता सिल्व्हर स्क्रिन वर एकत्र येणार आहेत. यश चोप्रा यांच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये ते दोघे एकत्र दिसणार आहेत. आता पहिल्यांदाच सल्लूच्या एक्स गर्ल फ्रेण्ड ची जोडी एस आर के सोबत जमली आहे. तीन वर्षा पूर्वी कतरिनाच्या बर्थडे पार्टीला सलमान आणि शाहरुख मध्ये चांगलीच जुंपली होती. कॅट आणि शाहरुखच्या मैत्रीवर दोघांच्या या भांडणाचा काहीही फरक पडला नव्हता आता रिअल लाईफ मध्ये एवढी चांगली केमेस्ट्री असेल तर रिअल लाईफमध्ये अर्थात सिनेमामध्ये या दोघांची जोडी काय कमाल दाखवते ते बघण्यासारख आहे. याच बरोबर 'रेडी' या सिनेमातून सलमान खान आणि आसीन ही जोडी पुन्हा एकत्र पडद्यावर दिसणार आहे. लंडन ड्रीम्सनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. या सिनेमाचे फर्स्ट शूट नुकतेच कोलोम्बोमध्ये झाले. अनिस बझमी दिग्दर्शित या सिनेमात गझनी फेम आसीन सलमान खानसह मुख्य भूमिकेत आहे. 'रेडी' हा सिनेमा प्रेम आणि संजना यांच्या प्रेमकथेवर आधारीत आहे. पण या प्रेमकथेला थोडा कौटुंबिक टचही देण्यात आलाय. संपत्ती हडप करण्याच्या स्वार्थापोटी होणारी भांडणंआणि कॉमेडी त्यामुळे दिग्दर्शकाच्या मते हा सिनेमा एक कौटुंबिक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाची निर्मिती टी सिरीज फेम भूषण कुमारने यांनी केली आहे. सिनेमाचे संपूर्ण शूट श्रीलंका, थायलँड आणि मुंबईत होणार आहे. सलमान आणि आसीनसह या सिनेमात आर्या बब्बर, परेश रावल आणि महेश मांजरेकरही आहे. तसेच सिनेमाला संगीत संगीतकार प्रीतम यांनी दिलं आहे. पण या सिनेमासाठी 3 जून पर्यंत वाट पाहावी लागेल.