#शाहरुख खान

Showing of 196 - 206 from 206 results
वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन !

बातम्याMay 17, 2012

वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन !

17 मेबॉलीवूडचा बादशहा शाहरुख परत एकदा वादात अडकण्याची चिन्ह आहेत. मुंबई क्रिकेट असोशिएशनने शहारुख खान विरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली आहे.शाहरुखवर आरोप करण्यात आले आहेत की त्याने मॅच संपल्यानंतर मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला अडवणार्‍या सुरक्षा रक्षकांना शिव्या दिल्या आणि त्यानंतर त्याला समजवणार्‍या बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना त्याने मारहाण देखील केली. बुधवारी रात्री जेव्हा मुबंई इडियन्स विरुध्दची मॅच कोलकता नाईट रायडर्स ने जिंकली त्यानंतरच्या बक्षीस संमारभानतर रिकाम्या मैदानात शाहरुखने घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला यावेळी मैदानात जाता येणार नाही असे सांगुन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या अडवणार्‍या सुरक्षा रक्षकांना शिव्या देऊनच शाहरुख थांबला नाही तर त्यानंतर त्याने त्याना मारहाण केल्याचा देखील आरोप केला जातोय. हे थांबवण्याचा प्रयत्न करणार्‍या बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना देखील त्याने बेमुर्तपणे धमकावलं. यांनतर शाहरुखविरुद्द BCCI च्या अधिकार्‍यांनी मरिन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुद्दा तत्परतेने चौकशी सुरु केलीय. चौकशी नंतरच पुढील कारवाई ठरेल अस पोलीसांच म्हटलंय शाहरुख खान वर फक्त तक्रार दाखल करुनच बीसीसीआय थांबलेली नाही तर शाहरुखला वानखेडेवर प्रवेश करायला आजन्म बंदी घालण्याची कडक कारवाई करण्याचे संकेतही बीसीसीआयने दिले आहे. असं झाल्यास शाहरुखला फक्त आयपीएल नाहीतर वानखेडेवरच्या वनडे आणि टेस्ट सामन्यानाही मुकावे लागेलशाहरुखच्या चौकशीत खर काय ते बाहेर येईलच पण शाहरुख अस वाद का ओढवुन घेतोय ? टीमच्या विजया आणि पराजयापेक्षा शाहरुख जास्त का चर्चीला जातोय. ही घटना जर खरी मानली तर शाहरुखने स्टेडियम मध्येच दारु प्यायली हे स्पष्ट आहे. यापुर्वी आयपीएलमधल्या जयपुरच्या मॅच च्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिताना दिसल्याने वादात सापडला होता

Live TV

News18 Lokmat
close