दिनेश केळुसकर, 31 जानेवारी : सिंधुदुर्गातल्या शिरोडा समुद्रात पारंपारिक मच्छिमारांच्या जाळ्यात आज भला मोठा शार्क मासा मिळाला. या शार्कची लांबी 12 फूट असून वजन तब्बल 350 किलो आहे. शिरोडा केरवाडा इथले मच्छिमार सावळाराम चोडणकर आज सकाळी आपली छोटी मासेमारी नौका घेऊन समुद्रात गेले होते. त्यावेळी जाळं ओढताना त्यांच्या जाळ्याचं वजन अचानक वाढल्याच त्याना जाणवलं. मग, इतर मच्छिमारांची मदत घेउन त्यानी हा मासा किनाऱ्यावर आणला. स्थानिक भाषेत याला मोरी म्हटल जातं आणि हा मासा अत्यंत चविष्ट आणि किंमती आहे.