#शरद पवार

Showing of 79 - 92 from 1754 results
Special Report : मोदींविरोधात 'एकता'!

व्हिडिओJan 19, 2019

Special Report : मोदींविरोधात 'एकता'!

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली होती. या सभेला तब्बल 22 राजकीय पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली. शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चंद्राबाबू नायडू, शरद यादव, अरविंद केजरीवाल, यासह अनेक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित होते. सर्वच नेत्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मात्र स्वत: या सभेला उपस्थित नव्हते. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. मोदी सरकार हटवणं हेच ध्येय असल्याचा सूर सर्व नेत्यांनी आळवला. विरोधकांच्या व्यासपीठावरची भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी होती. तर गुजरातमध्ये भाषण करताना मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एकत्रित आलेल्या महाआघाडीवर जोरदार टीका केली. आपल्या रागापोटी आता हे लोक महागठबंधन करत असून, लोकशाहीचा गळा घोटणारेच लोकशाहीची भाषा करत असल्याचं ते म्हणाले. जे आधी काँग्रेसवर टीका करत होते ते आता एकत्र आले असल्याचंही ते म्हणाले. पाहुया विशेष रिपोर्ट..

Live TV

News18 Lokmat
close