#व्ही शांताराम

Showing of 14 - 18 from 18 results
व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

बातम्याApr 17, 2010

व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

17 एप्रिल महाराष्ट्र सरकारचे व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर अभिनेता, निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. तर निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.