#व्ही के सिंग

Showing of 53 - 61 from 61 results
'पत्र लीक होणं, हा मोठा कट'

बातम्याMar 29, 2012

'पत्र लीक होणं, हा मोठा कट'

29 मार्चलष्कर प्रमुख व्हि.के. सिंग यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पाठवलेलं पत्र फुटल्याचा मुद्दा आजही गाजत राहिला. सरकारने या प्रकरणाची चौकशी गुप्तचर विभागाला सोपवली. पत्र लिक होणं हे देशविरोधी कृत्य आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करु, असं आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिलं. तसेच लष्कर प्रमुखांच्या बडतर्फीच्या बातम्यांनाही पुर्णविराम लावला. पण लष्कर प्रमुखांनी आज पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला. एका खासदाराने लेफ्टनंट जनरल दलबीर सुहाग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार करणारं पत्र लष्कर प्रमुखांना लिहलं होतं. ते पत्र व्ही. के. सिंग यांनी परस्पर सीबीआयकडे पाठवलं आहे. लष्कर प्रमुख विरुद्ध सरकार वाद दिवसेंदिवस पेटतोय. पण संरक्षण मंत्र्यांनी हा वाद शमवण्याचा प्रयत्न सुरु केला. तिन्ही दलांच्या प्रमुखांवर पूर्ण विश्वास असल्याचं ए. के. ऍन्टोनी यांनी सांगितलं. दिल्लीत भरलेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये संरक्षण मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचं देहबोली अतिशय मृदू आणि मैत्रीपूर्ण होती. पण लष्कर प्रमुख व्हि. के. सिंग यांनी मात्र एक पत्रक काढून पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलंय. पंतप्रधानांना पाठवलेलं पत्र लिक होणं हा एक मोठा कट आहे. माझी प्रतिष्ठा डागाळण्याचा हा द्वेषपूर्ण प्रयत्न थांबवायला हवा. पत्र लिक करणार्‍याचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करायला हवी. या वादात आणखी एका नव्या वादाची भर पडली. तृणमूलच्या एका खासदाराने 2011 साली लेफ्टनंट जनरल दलबीर सुहाग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार करणारं पत्र लिहलं होतं. व्हि. के. सिंग यांनी हे पत्र परस्पर सीबीआयला पाठवलं. यावरही संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांना मिळाली. काही पक्षांनी लष्करप्रमुखांच्या बडतर्फीची मागणी केली असली. तरी भाजपनं मात्र हे सरकारचं अपयश असल्याचं म्हटलंय. लष्कर प्रमुखांच्या वादावरुन नाचक्की झालेल्या सरकारला वाचवण्यासाठी आता पंतप्रधान काही पाऊल उचलतील का, हाच खरा प्रश्न आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही लाच देण्याचा प्रयत्न - कुमारस्वामी दरम्यान, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी एक नवा आरोप केला. एच. डी. देवेगौडा जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांनाही लाच देण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट एच डी कुमारस्वामी यांनी केला. लष्कराच्या एका करारासंदर्भात एका दलालाने देवेगौडांना लाच देण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला होता, असंही त्यांनी म्हटलं. पण, देवेगौडा यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला.