#व्ही के सिंग

Showing of 40 - 53 from 61 results
पाच कंपन्यांविरोधात FIR दाखल

बातम्याSep 4, 2012

पाच कंपन्यांविरोधात FIR दाखल

अरूणोदय मुखर्जी, नवी दिल्ली04 सप्टेंबरकोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज देशभरात कारवाईला सुरूवात केली आहे. 10 शहरांमध्ये 31 ठिकाणी छापे घालण्यात आले आहे. मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज संध्याकाळी 5 खासगी कंपन्यांविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केले. काँग्रेस खासदार विजय दर्डा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, देवेंद्र दर्डा यांची या एफआयआरमध्ये नावं आहेत. शिवाय मनोज जैस्वाल, आनंद जैस्वाल, अभिषेक जैस्वाल, अरविंद कुमार जैस्वाल, रमेश जैस्वाल यांचीही नावं एफआयआरमध्ये आहेत. केंद्र सरकारकडून कोळसा खाणी अत्यल्प किमतीला घेऊन त्या जास्त किमतीला इतर कंपन्यांना विकल्या आणि खाण घेऊनही कोळशाचं उत्खनन केलं नाही असे आरोप सीबीआयने ठेवले आहे. कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांविरोधात आता सीबीआय तपासाचा फास आवळला जातोय. याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी देशभरातल्या दहा शहरांमध्ये तब्बल तीस ठिकाणी छापे टाकले. इतकंच नाही तर पाच खाजगी कंपन्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आलाय. या पाच कंपन्यांवर फसवणूक आणि फौजदारी कटाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कंपन्या खाजगी असल्या तरी त्यांचा बड्या राजकीय नेत्यांशी जवळचा संबंध आहे. या 5 कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल1) नवभारत पॉवर : या कंपनीचे प्रमोटर व्ही. के. सिंग यांच्या पत्नीनं भाजपच्या तिकीटावर छत्तीसगढमधून निवडणूक लढवली होतीआरोप : ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कंपनीच नसताना या कंपनीला कोळसा खाणीचं कंत्राट मिळालं. त्यानंतर या कंपनीनं त्यातले 74 टक्के स्टेक्स दुसर्‍या कंपनीला विकले2) विन्नी आयर्न अँड स्टील : या कंपनीचे झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्याशी जवळचे संबंध आहेतआरोप : या कंपनीनं अधिकारांचा गैरवापर करत कोळसा खाणी मिळवल्या3) एएमआर आयर्न अँड स्टील : कंपनीसंबंधी संपूर्ण माहिती दिली नसतानाही खाजगी शिफारशीवर कोळसा खाणी मिळाल्याचा आरोप आहे4) जेएएस इन्फ्रा कॅपिटल : काँग्रेस खासदार विजय दर्डा यांच्याशी संबंधित ही कंपनी आहे.आरोप : कोळसा कंपनीत आधीच पैसे गुंतवल्याची माहिती लपवली आणि अत्यल्प किमतीला नव्या कोळसा खाणी मिळवल्या5) जेएलडी यवतमाळ एनर्जी : काँग्रेस खासदार विजय दर्डांची ही कंपनी आहेआरोप : या कंपनीनं खाण मिळवली पण त्यातून कोळसा उत्पादन केलं नाहीसीबीआयने दाखल केलेल्या या एफआयआरवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी समाधान व्यक्त केलंय. पण ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले तिच्याशी आपण 2008 सालीच वेगळे झालो होत, असं महाराष्ट्रातले मंत्री राजेंद्र दर्डांनी म्हटलंय. सीबीआयच्या एफआयआरमध्ये राज्य आणि केंद्र सरकारमधल्या काही अधिकार्‍यांचाही समावेश आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशींवर एफआयआरआधारित आहेत. त्यांचा कॅग अहवालाशी संबंध नाही,असं एफआयआरनं स्पष्ट केलंय. सध्या फक्त पाच कंपन्यांविरोधात कारवाई झालीय. पण सीबीआयची नजर आणखीही 30 कंपन्यांवर आहे. पण या प्रकरणाचे राजकीय परिणाम बघता सीबीआय सध्या तरी सावध पावलं टाकतेय.