#व्हाॅट्सअॅप

VIDEO : सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांनो, वीरपत्नी काय म्हणते ते ऐकाच!

व्हिडिओFeb 28, 2019

VIDEO : सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांनो, वीरपत्नी काय म्हणते ते ऐकाच!

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 28 फेब्रुवारी : 'निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हाॅट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या' असा सल्ला शहिद स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे वीरपत्नीने दिला आहे. तसंच 'आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये' अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

Live TV

News18 Lokmat
close