#वैजापूर

VIDEO: औरंगाबादमध्ये गोदावरी नदीला महापूर, सरला बेटाला पाण्याचा वेढा

बातम्याAug 6, 2019

VIDEO: औरंगाबादमध्ये गोदावरी नदीला महापूर, सरला बेटाला पाण्याचा वेढा

औरंगाबाद, 06 ऑगस्ट : नाशिकहून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गोदावरी नदीच्या पात्रात प्रचंड पाण्याची वाढ झाली आहे. 2 लाख क्यूसेकने पाणी मराठवाड्याकडे झेपत आहे. मराठवाड्यातील गोदावरी काठावरील अनेक गावांमध्ये नदीच पाणी घुसले आहे. वैजापूर तालुक्यातील सरला बेटाला पाण्याने दोन दिवसांपासून वेढा घातला आहे. बेटावरील महानुभाव पंथाचे अनेक भाविक बेटावर अडकले आहेत. मात्र, ते सुरक्षित आहेत. औरंगाबाद जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि SDRF ची टीम पूर परिस्थिवर नियंत्रण ठेवून आहे. पाण्याच्या प्रचंड अवकामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता 36 टक्केपर्यंत झाली आहे.