#वीज दरवाढ

अन्यथा ऊस कारखाने सुरू करू देणार नाही -शेट्टी

बातम्याOct 27, 2012

अन्यथा ऊस कारखाने सुरू करू देणार नाही -शेट्टी

27 ऑक्टोबरउसाचे गेल्या वर्षीचे पैसे आधी द्या अन्यथा कारखाने सुरु करू देणार नाही असा थेट इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. जयसिंगपुरात झालेल्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी ऊसाला 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचीही आग्रही मागणी केली आहे. सरकारनं 1 तारखेपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा इंदापूर आणि कराडमध्ये आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. गुजरातमध्ये उसाला चांगला भाव मिळतो मग राज्यात का नाही असा सवाल करत दर द्या नाहीतर नाही तर मग आम्ही कायदा का हातात घेऊ नये असाही इशारा त्यांनी दिला. या ऊस परिषदेत एकूण 12 ठराव संमत करण्यात आले. या परिषदेला मराठवाडा आणि विदर्भातील 10 हजार शेतकरी उपस्थित होते.ऊस परिषदेतले ठराव- सी.रंगराजन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करा- उसाला 3 हजारांचा पहिला हप्ता द्या- एफडीआयला पाठिंबा- वजनकाट्यासाठी निधी द्या- वीज दरवाढ मागे घ्या- साखर आयातीला विरोध- उसाच्या राज्यबंदीला विरोध- ऊस जळीत विमा लागू करावा- दूध खरेदी दरात 5 रुपयांची दरवाढ करा

Live TV

News18 Lokmat
close