विहिंप Videos in Marathi

फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध, पाहा VIDEO

बातम्याSep 24, 2019

फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध, पाहा VIDEO

उस्मानाबाद, 24 सप्टेंबर : उस्मानाबाद इथे होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने तीव्र विरोध दर्शवला आहे. विहिंप करत असलेल्या विरोधामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. विहिंपनं दिब्रिटो हे सक्तीनं धर्मांतरण करतात आणि हिंदू संतांना विरोध करतात असं म्हणत विरोध केला आहे. दिब्रिटोंची निवड करणं म्हणजे साहित्यिकांच्या दिवाळखोरीचं लक्षण असल्याचं म्हणत विहिंपचे पुणे जिल्हामंत्री नितीन वाटकरांनी टीका केली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading