भिवंडी, प्रदीप भणगे, 25 सप्टेंबर : गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. भिवंडीतील म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली. अजगर अन्सारी असं मारहाण झालेल्या युवकाचा नाव आहे. भिवंडी शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातून निघालेल्या गणेश मिरवणूक आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरून पाहत असलेल्या युवकाचा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांशी किरकोळ बाचाबाची झाली त्या नंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या युवकाला घरात घुसून पोलिसांसमोरच बेदम मारहाण करायला सुरुवात केली यात हा युवक जखमी झाला. सर्वात महत्त्वाचे बाब म्हणजे पोलिसांनी अद्याप कोणावरही कार्यवाही केलेली नाही. ही घटना निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या युवकाला मारहाण करणाऱ्या मंडळाचं नाव तसंच घटनेची माहिती देखील पोलिसांना नाही. मात्र व्हिडिओमध्ये पहिला असता युवकाला ज्या ठिकाणी मारहाण होत आहे त्या ठिकाणी दोन ते तीन पोलीस कर्मचारी मध्यस्थी करत असताना स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ एका स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करून शोसल मीडियावर व्हायरल केला आहे. मात्र अजूनही भिवंडी पोलिसांनी काहीही कार्यवाही केलेली नाही.