#विश्व हिंदू परिषद

Showing of 40 - 42 from 42 results
मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात आणखी अटकेची शक्यता

बातम्याNov 26, 2008

मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात आणखी अटकेची शक्यता

26 नोव्हेंबर, औरंगबादसंजय वरकड, शेख मुजीबमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राकेश धावडेकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड, परभणी, पूर्णा आणि जालन्यातील बॉम्बस्फोटातील आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान धावडे आणि नांदेड स्फोटातील आरोपींना बारा डिसेंबरला नांदेड सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळं सीबीआयच्या तपासात आणखी काही नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.मालेगाव बॉम्बस्फोटांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी मराठवाड्यातल्या पूर्णा, परभणी, जालना इथल्या मशिदींमध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर औरंगाबामधल्या निराला बाजार, खडकेश्वर आणि नारळीबाग या भागातही स्फोटांच्या चाचण्या झाल्या. या सर्व स्फोटांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींशी धावडेचे संबंध होते.मालेगाव स्फोटातला एक प्रमुख आरोपी मिथुन चक्रवर्ती याचा नांदेड स्फोटातही सहभाग होता. धावडे आणि चक्रवर्तीचे मराठवाड्यात झालेल्या स्फोटांमधल्या आरोपींशी असलेले नेमके संबंध आणि त्यांनी आखलेल्या कटांबाबत नवी माहितीही या तपासात पुढे येतेय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं सक्रीय काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांनी स्फोटात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भाग घेतल्याचाही संशय व्यक्त होतोय.आयबीएन लोकमत, औरंगाबाद - मालेगाव बॉब्मस्फोटातील आरोपी राकेश धावडे सध्या परभणी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून आणखी धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मालेगावच्या तपासानंतर मरावाड्यातील जालना, परभणी, पूर्णा आणि नांदेडमधील स्फोटांच्या तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. राकेश धावडे यानं बॉम्बस्फोटांच्या प्रशिक्षणाबाबत प्रा. देव यांचं नाव घेतलं, पण हे देव कुठं आहेत हे माहित नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. याचा अर्थ मिथुन चक्रवर्ती, प्रा. देव ही नावं खोटी असण्याची शक्यता आहे. मग ही खोटी नावं धारण करणारे नेमके कोण आहेत, हे तपासलं जातंय हिमांशू पानसे याच्याकडं स्फोटकं देणार्‍याचं नावही मिथुन चक्रवर्ती असंच होतं. मिथुन चक्रवर्ती, प्रा. देव अशी नावं सांगणारा एखादा लष्करी अधिकारीच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नांदेड स्फोटाच्या तपासासारख्याच परभणी, पूर्णा, जालना स्फोटांच्या तपासातही अनेक त्रुटी आहेत. त्यावरही आता प्रकाश पडतोय.