#विश्वास नांगरे पाटील

VIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत

व्हिडिओSep 22, 2018

VIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत

कोल्हापू, 22 सप्टेंबर : डॉल्बी वाजणारच असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डॉल्बीवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय. गणपती मिरवणुकीत रात्रीच्या वेळीही डॉल्बी वाजवण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालय आणि पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान देत डीजे लावणारच असल्याचा सज्जड दम भरलाय. आता पोलीस प्रशासनही डीजेवर कारवाई करण्याबाबत ठाम असल्याचे संकेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेत. त्यामुळे उद्या साताऱ्या कोणाचं राज चालणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close