News18 Lokmat

#विमानतळ

Showing of 209 - 222 from 260 results
अटकेनंतरही अतिरेक्याची बेपत्ता असल्याची तक्रार नोंद

बातम्याOct 12, 2012

अटकेनंतरही अतिरेक्याची बेपत्ता असल्याची तक्रार नोंद

12 ऑक्टोबरनांदेड पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा प्रकार आता पुढं आला आहे. पुणे बॉम्ब स्फोटप्रकरणी काल दिल्लीत अटक झालेला अतिरेकी इम्रान खान हा बेपत्ता असल्याची तक्रार आज नांदेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. इम्रानचे वडील वाजेद खान यांनी आज विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली. गेल्या 10 दिवसांपासून इम्रान फरार असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पण यामुळे नांदेड एटीएस आणि नांदेड पोलिसांमध्ये संवाद नसल्याचं उघड झालंय. कारण इम्रानला अटक केल्याची माहिती नांदेड एटीएसनं त्याच्या कुटुंबीयांना आधीच कळवली होती. पण तरीही त्याच्या वडिलांनी आज पोलीस स्टेशनला जाऊन तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यामुळे इम्रान हा अटकेत असल्याची माहिती एटीएसनं नांदेड पोलिसांना दिली नव्हती का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.