Elec-widget

#विनोद तावडे

Showing of 170 - 179 from 179 results
लोकांच्या प्रार्थनांमुळे, बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -देसाई

बातम्याNov 15, 2012

लोकांच्या प्रार्थनांमुळे, बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -देसाई

15 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. बाळासाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्यांची प्रकृतीत सुधारणा होतं आहे अशी दिलासादायक माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली. तसंच देशभरातील करोडो शिवसैनिक आणि सेनाप्रेमी यांच्या सदिच्छा आणि प्रार्थनामुळं हे शक्य होऊ शकलं आहे. सर्व शिवसैनिकांनी संयम बाळगला त्यांचे आम्ही आभारी आहोत. लवकरच बाळासाहेब बरे होतील असा विश्वासही सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेबांचे वैद्यकिय बुलेटीनची माहिती घेतल्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुपारी 1 च्या सुमाराला संजय राऊत यांनी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. तसेच डॉक्टरांच्या उपचारांना बाळासाहेब चांगला प्रतिसाद देत आहे असंही संजय राऊत यांनी सांगितलं होतं. बुधवारी रात्री बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. आज सकाळपासून मातोश्रीवर पुन्हा गर्दी वाढू लागलीय. मातोश्रीबाहेरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. पोलिसांबरोबरच रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवानही तैनात करण्यात आलेत. राज ठाकरे आणि ज्येष्ठ शिवसेना नेते रात्रभर मातोश्रीवर होते. आज सकाळी मनोहर जोशी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, अभिनेता नाना पाटेकर यांनी सकाळी मातोश्रीवर भेट दिली. तर रात्री अमिताभ आणि अभिषेक बच्चन, संजय दत्त मातोश्रीवर येऊन गेले. दुपारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, अभिनेता सलमान खान, नाना पाटेकर, दिग्दर्शक मधुर भांडारकर मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस केली.