#विनोद तावडे

Showing of 755 - 768 from 795 results
निवडणुकात बनावट नोटांना फुटले पाय ?

बातम्याFeb 6, 2012

निवडणुकात बनावट नोटांना फुटले पाय ?

सुधाकर काश्यप, मुंबई06 फेब्रुवारीमुंबईत सध्या निवडणुकीचं वातावरण तापत चाललं आहे आणि आतापर्यंत झाली नाही अशी निवडणूक यावेळी होणार आहे, कारण या निवडणुकीत वाटला जाणारा पैसा.. निवडणुकीत वाटल्या जाणार्‍या या पैशात नकली नोटा मिसळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नकली नोटांचा भाव वधारला आहे.निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सर्वच पक्षांत बंडखोरांचं प्रचंड पिक आलं आहे. त्यामुळे आता मतदारांना खुष करण्यासाठी वापर होणार आहे तो हुकमी अस्त्र म्हणजेच पैशाचा...पण एवढा पैसा आणणार कोठून? यावर काही उमेदवारांनी शक्कल लढवत खोट्या नोटा वाटण्यास सुरूवात केल्यायत असा गंभीर आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला. निवडणुकांची वेळ असल्याने खोट्या नोटांचा भावही वाढल्याचं आता पोलीस सांगत आहे.गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त हिमांशू रॉय म्हणतात, आता 70 रुपयांच्या खर्‍या नोटांच्या बदल्यात 100 रुपये बोगस असा हिशेब असणार आहेयाआधीही अस अनेक प्रकार झाले आहेत 2008 मध्ये 79 लाखांच्या बोगस नोटा जप्त करण्यात आल्या आणि 82 आरोपींना अटक करण्यात आली. 2009 40 लाखांच्या नोटा जप्त, तर 53 जणांना अटक, आणि 2010 मध्ये 43 लाखांच्या बोगस नोटा जप्त करून 53 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 2011 मध्ये 75 लाखांच्या बोगस नोटा जप्त झाल्या आणि 42 केसेस दाखल झाल्या आहेत. बोगस नोटांचा वापर निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात होण्याची शक्यता आहे.मात्र, हे प्रकार रोखण्यासाठी क्राईम ब्रँचने एका विशेष पथकाची स्थापना केली आहे.बनावट पैसा भारतात पाठवून अतिरेकी हल्ल्यांसाठी त्याचा वापर झाल्याचे याआधीही उघड झाले आहे. पण आता थेट निवडणुकीतच बनावट नोटा वापरुन मोठे राजकीय बदल घडवण्याचे प्रयत्न होत आहेत. हे देशासाठी अतिरेकी हल्ल्याहून अधिक धोकादायक आहेत. ते वेळीच रोखण्याची गरज आहे.