#विधानसभा

Showing of 5487 - 5500 from 5927 results
क्षितिज ठाकूर,राम कदम यांचे स्पष्टीकरण

बातम्याMar 19, 2013

क्षितिज ठाकूर,राम कदम यांचे स्पष्टीकरण

19 मार्चमुंबई :आज विधानभवनात आम्ही एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली नाही. आम्ही सगळे आमदार सूर्यवंशींना समजवण्यासाठी गेलो असताना त्यांनीच राम कदम यांना धक्का दिला आणि ते खाली पडले यांनंतर झालेल्या झटापटीत ते खाली पडले आणि मार लागला. पण सूर्यवंशी विधानभवनात उद्धटपणे वागले, यात त्यांचीच चूक आहे. त्यांचे समर्थन केले जाणार या सर्व प्रकरणात मी स्वत: जबाबदारी घेतो त्यात बाकीच्या आमदारांची चुकी नाही असा खुलासा आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला. तसंच या प्रकरणी माफी मागणार नाही आणि दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईल असंही ठाकूर यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. उद्या कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.आज विधानभवनात आमदारांनी एका API ला मारहाण केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. नालासोपार्‍याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली. या मारहाणीत भाजप आमदार जयकुमार रावल,मनसेचे आमदार राम कदम, औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल सहभागी होते.या मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी विधानसभा अध्यक्षांनी केली आणि त्यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. API ला मारहाणीचा प्रकार दुर्देवी असल्याचं ते म्हणाले या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निर्णय देणार नाही आणि कुठलाही निर्णय घाईत घेणार नाही. त्याचबरोबर कुणालाही यासंदर्भात माफ केलं जाणार नाही अशी माहिती विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. संध्याकाळी आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम आणि इतर आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. सोमवारी सी लिंकवर क्षितिज ठाकूर यांची गाडी सूर्यवंशी यांनी अडवली. सूर्यवंशी यांनी गाडी अडवून ड्रायव्हरसोबत हुज्जत घातली, स् उद्धटपणे वागले. त्यांनी आरेतुरेची भाषा वापरली असा आरोप ठाकूर यांनी केला. त्यांनंतर ठाकूर यांनी सातशे रुपयांची पावती फाडली. मात्र सूर्यवंशी यांनी माझ्यावर दोन गुन्हे दाखल केले याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी दमदाटी केली असा आरोपही ठाकूर यांनी केला. त्याच दिवशी ठाकूर यांनी तक्रार दाखल केली आणि सूर्यवंशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. आज हक्कभगांचा प्रस्ताव सादर करते वेळी सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत हजर होते त्यांनी शिविगाळ केला त्यांना समजवण्यासाठी गेलो असता त्यांनीच राम कदम यांनी धक्का दिला आणि राम कदम खाली पडले. त्यानंतर झालेल्या झटापटीत सूर्यवंशी खाली पडले आणि जखमी झाले. या सगळ्या प्रकरणात सूर्यवंशीचीच चुकी आहे. आमचा वाद पोलीस दलाशी नाही. त्यामुळे या प्रकरणी माफी मागणार नाही. जर दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईल असंही ठाकूर यांनी सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेत ठाकूर यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं फूटेज दाखवलं आणि सर्व आमदारांचे स्वाक्षरीचे पत्रही दाखवले. मात्र याप्रकरणी उद्या कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे