विठ्ठल

Showing of 404 - 411 from 411 results
ज्येष्ठ विचारवंत भा. ल. भोळे यांचं निधन

बातम्याDec 24, 2009

ज्येष्ठ विचारवंत भा. ल. भोळे यांचं निधन

24 डिसेंबर ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल. भोळे यांचं गुरुवारी नागपूरमध्ये दिर्घ आजाराने निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. साहित्यिक, प्राध्यापक, पुरोगामी विचारवंत म्हणून भोळेसरांना ओळखलं जायचं. गांधी-आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांनी बरच लिखाण केलं. त्यांचं 'बदलता भारत' हे पुस्तक प्रसिध्द आहे. शिवाय त्यांची राज्यशास्त्रावरची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. डॉ. भा. ल. भोळे यांचं सामाजिक आणि राजकीय लिखाण असलेली अनेक पुस्तकं अभ्यासकांसाठी मोलाचा संदर्भ ठेवा आहेत. नवी घटना दुरुस्ती : अन्वय आणि अर्थ, दुसरे स्वातंत्र्य, राजकीय भारत सत्तांतर आणि नंतर, शिक्षण आणि संस्कृती, यशवंतराव चव्हाण : राजकारण आणि साहित्य, महात्मा फुले : वारसा आणि वसा, भारताचे स्वातंत्र्य : 50 वर्षांचा मागोवा, विसावे शतक आणि भारतातील समता विचार, डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे बहुजनवादी राजकारण असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. तर जमातवाद : राष्ट्र, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, संदर्भ दलित चळवळींचा, शतकांतरांच्या वळणावर, एकोणिसाव्या शतकातील गद्य या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलंय. भा.ल.भोळे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान 2000 मध्ये युगांतर पुरस्कार 2006 मध्ये कर्मवीर दादासाहेब कन्नमवार स्मृती पुरस्कार 2007 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशनचा साहित्य पुरस्कार 2008 साली प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार समाज प्रबोधनासाठी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात संशोधनात्मक कार्य केल्याबद्दल 2009 साली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading