विठ्ठल मंदिर Videos in Marathi

VIDEO : एका बुक्कीत दात पाडेन, काँग्रेस आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी

व्हिडीओMar 15, 2019

VIDEO : एका बुक्कीत दात पाडेन, काँग्रेस आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी

विरेंद्र उत्पात, पंढरपूर, 15 मार्च : विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यावरून आज कॉंगेसचे आमदार भारत भालके आणि पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी झाली. यावेळी आमदार भारत भालकेंनी पोलिस निरीक्षक विश्वास साळुखे यांना अरेरावी करत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अतिक्रमणाविरोधात सुरू केलेली कारवाई थांबवावी अशी मागणी करत आमदार भारत भालकेनी पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी मंदिर परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला खुद्द आमदारांनीच विरोध करत पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. या प्रकरणी आमदार भालके यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.