#विठ्ठल मंदिर

Showing of 27 - 27 from 27 results
पंढरपुरातील रस्त्यांचे वाजले बारा

बातम्याJun 30, 2010

पंढरपुरातील रस्त्यांचे वाजले बारा

30 जूनवारी सोहळा सुरू व्हायला आता फक्त काही दिवसच बाकी राहिले आहेत. पण पंढरपूरमधील रस्त्यांचे मात्र बारा वाजले आहेत. राज्यातून लाखो वारकरी आषाढीच्या निमित्ताने पंढरीत दाखल होत असतात. आता आषाढी यात्रा जवळ आली असतानाही, प्रशासन मात्र सुस्तच दिसत आहे. खोदलेले रस्ते, रस्त्यावर टाकलेला मुरूम आणि नाल्यांची अर्धवट कामे यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळा असल्याने रस्त्यावरचा चिखल तुडवत नागरिकांना वाट काढवी लागत आहे. पंढरपूर पालिकेचे मुख्याधिकारी आणि विठ्ठल मंदिर समितीच्या दोन्ही जागा सध्या रिक्त आहेत. अधिकारी नुसतेच बैठका घेत असून काहीही काम होत नाही, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.तर या अपुर्‍या रस्त्यांमुळे ऐन यात्रेच्या काळात चेंगराचेंगरीची घटनाही होऊ शकते, अशी भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान वारकरी पंढरपुरात येण्यापूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा दावा पंढरपूरचे अपक्ष आमदार भारत भालके यांनी केला आहे.