#विचारपूस

Showing of 183 - 196 from 224 results
बाळासाहेबांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'मातोश्री'वर

बातम्याOct 26, 2012

बाळासाहेबांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'मातोश्री'वर

26 ऑक्टोबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. जवळपास सव्वा तास राज ठाकरे आणि बाळासाहेब भेट झाली. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. तसंच यावेळी नुकत्याच प्रसिध्द झालेल्या बाळासाहेबांच्या 'फटकारे' या पुस्तकावर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी या अगोदरही राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन आले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता मी थकलोय, शारीरिक दृष्ट्या कोसळलोय मी आजपर्यंत शिवसेना सांभाळली आणि तुम्हालाही सांभाळलं आता उद्धव, आदित्यला सांभाळा इमान राखा असं भावनिक आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एका व्हिडिओ व्दारे दिलं. बाळासाहेबांचा खणखर आवाजातील भाषणाची सवय असलेल्या शिवसैनिकांचं मात्र यावर्षी बाळासाहेबांच्या आवाजानं मन हेलावून गेलं. बाळासाहेबांच्या चिंतेपोटी अनेक शिवसैनिकांचे डोळे पाणावले. यावेळी दादरच्या पराभवाचे शल्य बाळासाहेबांनी बोलून दाखवले आणि मराठी माणसांनी तरी शिवसेनेच्या विरोधात उभे राहू नये एकत्र या आणि काँग्रेसला धूळ चार असं आवाहन राज यांचं नाव न घेता केलं होतं. बाळासाहेबांच्या भाषेत अंगाखाद्यांवर खेळलेले राज ठाकरे बाळासाहेबांचं भाषण एकूण अस्वस्थ झाले असतील हे कोणीही सांगण्याची गरज नाही. आज राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठली आणि बाळासाहेबांची भेट घेतली. यावेळी नुकत्याच प्रसिध्द झालेल्या बाळासाहेबांच्या `फटकारे` या पुस्तकावर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अँजिओप्लासिटीच्या वेळी राज स्वत:हा हजर होते. तब्बल साडेतीन वर्षानंतर ठाकरे बंधूंची भेट अख्या महाराष्ट्रानं पाहिली. पण या भेटीला भावनेची झालर होती. उद्धव हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर बाळासाहेबांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते. आज पुन्हा एकदा राज मातोश्रीवर दाखल झाले आहे. बाळासाहेब राज यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.