Elec-widget

#विक्री

Showing of 794 - 807 from 808 results
बिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 1

देशNov 16, 2008

बिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 1

सलाम महाराष्ट्रमध्ये गप्पा मारणार आहोत कौस्तुभ उपाध्येशी . कौस्तुभचं ट्रेकिंग, भटकंतीशी अतूट नातं आहे. त्याच्या ग्रुपचंही नाव तसंच आहे. जंगल लोअर ग्रुप. रुपारेलमधल्या ट्रेकिंगची, जंगल सफर करणा-या निर्सगप्रेमीं मित्रांनी एकत्र येऊन हा ग्रुप बनवला आहे. ट्रेकिंग म्हटलं की फोटोग्राफी आलीच. पण कौस्तुभ आणि त्याचे मित्र केवळ सुंदर दृश्याची फोटो काढत नव्हते तर निर्सगाचा, किल्ल्यांचा जेथे-जेथे -हास होतोय अशा ठिकाणची फोटोग्राफी करायचे. त्यांच्या फोटोग्राफीचा उद्देश होता, सर्वसामान्य लोकांमध्येही त्या ठिकाणाबद्दल, किल्ल्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी. निर्सगाबाबतचा दृष्टिकोन बदलावा यासाठी जंगल लोअर ग्रुपची स्थापना झाली. जंगल लोअर ग्रुप किल्ल्यांची भटकंती, ट्रेकस्, बर्ड वॉचिंगसारखे प्रोगॅम अरेंज करते. कौस्तुभ सांगतो कोणतीही संस्था चालवण्यासाठी पैसा लागतो.त्यामुळे त्यांनी या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट कंपन्याशी संर्पक केला. सुरुवातीला फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवलं त्यात फोटोची विक्री केली. त्यावेळी अनेकांच्या ओळखी झाल्या.त्याचा फायदा ग्रुप मोठा करण्यात झाला. किल्ल्यांवरील लोक, तसंच स्थानिकांचा ग्रुपमध्ये समावेश केला गेल्यामुळे तिथल्या लोकांना रोजगारही मिळाला.फक्त ट्रेकिंगसाठी अशी या संस्थेची ओळख नाहीए. जंगल लोअर ग्रुप फ्लेंमिगो वॉचिंग, बर्ड वॉचिंग सारखे प्रोगॅम अरेंज करते. यात सीनिअर सिटिझनसाठी खास वेगळी ट्रिटमेंण्ट दिली जाते.लहान मुलांसाठी मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्ये ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय सारखे प्रोग्रॅम आहेत.जंगल लोअर ग्रुप छोटया ट्रेकबरोबर वाइल्ड लाइफ सफारी, लेह-लडाख, भूतान येथे एक्सपिडिशनचेही आयोजन केलं जातं. परंतु केवळ ट्रेकिंग, एक्सपिडिशनमुळे निर्सगाबद्दल जनजागृती होणार नाही त्यासाठी ही संस्था स्लाइड शो, डॉक्युमेंटरी शोचं करते.तसंच त्यांच्यापैकी काहीजण न्यूजपेपरमध्ये आर्टीकल, फोटोस छापून उपेक्षित प्रश्नांना वाचा फोडतात. रिव्हर राफ्टिंग हा जंगल लोअर ग्रुपचा आगळा-वेगळा कॉन्फिडण्ट बिल्डिंग प्रोगॅम आहे. अनेक कॉर्पोरेट सेक्टरमधील अनेकांना या प्रोगॅममुळे खूपच फायदा झाल्याच कौस्तुभ सांगतो. आपल्या महाराष्ट्रात 350पेक्षा जास्त किल्ले आहेत. तसेच अनेक दुर्लक्षित जागा आहेत. त्याबाबत माहिती एकाच वेळी सर्वांना व्हावी. तसंच किल्ल्यांची डागडुगी सारखे कार्यक्रमामध्ये एकसूत्रता असावी याकरिता एका कॉमन प्लाटफॉर्मची गरज आहे असं कौस्तुभने सलाम महाराष्ट्राच्या माध्यमातून बोलून दाखवलं.कौस्तुभबरोबरच्या ट्रेकिंगच्या गप्पा आपण सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.