#विक्री

Showing of 768 - 781 from 793 results
बॉण्ड मार्केटमधली गुंतवणूक

बातम्याDec 14, 2008

बॉण्ड मार्केटमधली गुंतवणूक

बॉण्ड मार्केटमधली गुंतवणूकश्रीमंत व्हामध्ये सद्या मंदीच्याकाळात कुठे गुंतवणूक करावी याविषयी आपण माहिती घेत असतो. ह्या भागात आपण माहिती घेणार आहोत मंदीच्या काळात कोणते बॉण्ड आपल्याला आर्थिक फायदा करून देतील त्याबद्दल. याभागातील बॉण्डमधील गुंतवणुकीबद्दल माहिती दिली गुंतवणूक तज्ञ आशुतोष वखरे यांनीआपल्याला पहिला प्रश्न पडतो. मुळात बॉण्ड म्हणजे काय?आशुतोष सांगतात, जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारातील पैसा वापरासाठी घ्यायचा असतो. तेव्हा ती कंपनी शेअर किंवा बॉण्डच्या मार्फत पैसा उचलते. रक्कमेच्या पावतीचा कागद.बॉण्ड म्हणजेच उधारीवर घेतलेली रक्कम आणि ह्या बॉण्डची जिथे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतो. ते मार्केट म्हणजे बॉण्ड मार्केट. बॉण्डमध्ये कमीत कमी पाच कोटीपर्यंत गुंतवणूक करावी लागते.म्हणून सर्वसामान्य माणसांना बॉण्डमधली गुंतवणूक शक्य होतं नाही. त्यासाठी पर्याय म्हणून त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. ज्या बॉण्डची खरेदी-विक्री बाजारात होते, अशाच बॉण्डवर बाजाराच्या चढ-उताराचा परिणाम होतो. त्यामुळे त्याचा व्याजदर वाढतो. कमी होतो. सद्याच्या काळात शेअरच्या तुलनेत बॉण्ड जास्त सुरक्षित आहेत. पण बॉण्डमध्येही विविध प्रकारच्या रिस्क असतातच. ते रिस्क फॅक्टर व्यवस्थित हाताळले तर शेअरच्या तुलनेत बॉण्ड सुरक्षित असतात.रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी तयार केलेल्या नियमांचा परिणाम बॉण्डवर होत असतो.आशुतोष सांगतात ज्यावेळी तुम्हाला कोणतीही कंपनी 6 महिन्यात दुप्पट-तिप्पट रक्कम देत आहे. असं सांगते त्यावेळी ती गुंतवणूक किंवा कंपनीबद्दल पूर्ण माहिती घेऊन त्यात पैसे गुंतवावे. आपल्याला टॅक्स वाचावण्यासाठी गुंतवणूक करायची असल्यास विविध बँकच्या फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवावेत.सरकारला विविध कालावधीसाठी पैशाची गरज असते त्यावेळी ते बॉण्ड काढतात. मग ते 14 दिवसासाठी किंवा 30 वर्षाच्या काळासाठी बॉण्ड काढतात. गुंतवणूकदाराला कशात पैसा गुंतवायचा आहे ही त्यांची निवड असते.आपण जेव्हा एखादी रक्कम कोणाला उधारीवर देतो तेव्हा समोरचा आपल्याला जे सिक्युरिटी कागद /पेपर देतो त्याला बॉण्ड असं म्हणतात. सरकार/गर्व्हमेण्टला पैशाची गरज असते त्यावेळी ते जे बॉण्ड बाजारात आणतात. त्यांना गिल्ट सिक्युरिटी असं म्हणतात. तर प्रायव्हेट कंपन्या ज्यावेळी बॉण्ड काढतात त्यांना कॉर्पोरेट सिक्युरिटी किंवा डिबेंचर असं म्हणतात. बँका ज्यावेळी अशा पैशाची मागणी करतात त्याला बॉण्ड असं म्हणतात. अशाप्रकारे सोन्यामध्येही इटीएफ बॉण्डमार्फत गुंतवणूक करू शकतो.आशुतोष सांगतात, बँकासाठी काही नियम आहेत त्यामुळे त्यांच्याकडील काही टक्के रक्कम बँकांना गर्व्हमेण्ट सिक्युरिटीमध्ये गुंतवावीच लागते. म्हणून बँकाचे बॉण्ड हे इतरांपेक्षा सुरक्षित/फायदेशीर असतात.