विक्रम

Showing of 1171 - 1184 from 1240 results
नाट्यकर्मी विजया मेहता यांचा जाहीर सत्कार

बातम्याJan 28, 2011

नाट्यकर्मी विजया मेहता यांचा जाहीर सत्कार

28 जानेवारीरत्नागिरीत नाट्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर एक ह्रदय सोहळा पार पडला. जेष्ठ दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी विजया मेहता यांचा त्यांच्या शिष्यांनी सावरकर नाट्य सभागृहात जाहीर सत्कार केला. विजया बाईंचे शिष्य विक्रम गोखले, रिमा लागू, निना कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सुहास भालेकर, दिलीप कोल्हटकर यांनी सगळ्यांनी मिळून विजयाबाईंचा सत्कार केला. या ह्रदय सोहळ्याला रत्नागिरीकरांनी तुडुंब गर्दी केली होती. यावेळी स्वागताध्यक्ष उदय सामंत आणि नाट्यरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी हेही उपस्थित होते. सत्कारानंतर बॅरिस्टर या नाटकाचा प्रयोगही पार पडला.आपल्या आवडत्या रत्नागिरीत आपल्या शिष्यांकडून झालेल्या सत्कारानं विजयाबाई भारावून गेल्या होत्या.