#वसई

Showing of 14 - 27 from 53 results
VIDEO : वसईमध्ये 'हिट अँड रन',माॅर्निंग वाॅकला गेलेल्या दाम्पत्याला कारने उडवलं

व्हिडिओDec 21, 2018

VIDEO : वसईमध्ये 'हिट अँड रन',माॅर्निंग वाॅकला गेलेल्या दाम्पत्याला कारने उडवलं

विजय देसाई, 21 डिसेंबर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती-पत्नीला एका कारने जोराची धडक दिली. या धडकेत पती-पत्नी 5 ते 10 फूट उंच उडून खाली पडले. या धडकेनंतर कारचालक एवढ्यावरच थांबला नाही तर एकाजणाला कारखाली चिरडून तो पुढे गेला हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. वसई पूर्व एव्हरसाईन बस थांबा, सेक्टर २ जवळ आज सकाळी 6 वाजता ही घटना घडली. या घटनेत दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर वसईतील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीर सिकंदर अली आणि मीर सलमा अली दोघे पती-पत्नी सकाळी फिरत होते. त्यावेळी भरधाव कारने दोघांना जोरदार ठोकर देत फरफट नेलं. दरम्यान, कार चालक अपघातानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.