वसई

Showing of 378 - 391 from 433 results
कोणतीही भाडेवाढ नाही !

बातम्याFeb 25, 2011

कोणतीही भाडेवाढ नाही !

25 फेब्रुवारीरेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर्षीचं रेल्वे बजेट सादर केलं. रेल्वेचा फायदा बघतानाच या बजेटला लोकांचा चेहरा दिल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं खरं. पण आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनच पश्चिम बंगालवर अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे. कोलकाता मेट्रोलाही सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर दूसरीकडे कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. सामाजिक विकासासाठी रेल्वेचा उपयोग करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळेच देशातल्या दुर्गम भागांना रेल्वेनं देशाला जोडण्यात येणार आहे. यामध्ये बस्तर ते गडचिरोली हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र याबरोबरच पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन काही घोषणा केल्याचं स्पष्ट झालंय. कोलकाता मेट्रोला आणखी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच अनेक नविन योजनांच्या घोषणाही पश्चिम बंगालसाठी करण्यात आल्यात. रेल्वेच्या कर्मचार्‍यांचे कष्ट कोणीही बघत नाहीत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत रेल्वे कर्मचार्‍यांची काळजी घेतली जाणार आहे. तसेच रेल्वे कर्मचार्‍यांसाठी रेल्वे 10 हजार घरं बांधणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. रेल्वे सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र गेल्यावर्षी घोषणा केल्याप्रमाणे आतापर्यंत एकही वर्ल्ड क्लास स्टेशन उभारता आलं नाही याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. बिहारच्या नेत्यांचा गोंधळ एकीकडे ममता दीदी पश्चिम बंगालवर योजनांची खैरात करत होत्या आणि दुसरीकडे विरोधकांचा पारा चढत होता. कोलकात्याच्या मेट्रो रेल्वेला आणखी सुविधा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि बिहारच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.राज्यांना पुरस्कार योजना तर दुसरीकडे आंदोलन करताना रेल रोको केल्यानं रेल्वेचं खूप नुकसान होतं. त्यामुळे यापुढे ज्या राज्यात रेल रोको कमी होतील त्या राज्यांना पुरस्कार देण्याचं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे.रिझर्व्हेशनच्या दरात कपातरिझर्व्हेशनच्या दरातही ममतादीदींनी कपात केली आहेत. एसीच्या रिझर्व्हेशन दरात 10 तर नॉन एसीच्या दरात पाच रुपयांनी कपात करण्यात आली.महाराष्ट्रासाठी- हावडा- नांदेड एक्स.- नागपूर - भुसावळ एक्सप्रेस - तीन नव्या शताब्दी गाड्या त्यात पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा समावेश- गोंदिया- बल्लारशा पॅसेंजर- वसई रोड - पनवेल पॅसेंजर- सोलापूर- गदग व्हाया हुबळी- हुबळी-विलासपूर- थ्रू सोलापूर- दमण- नाशिक एक्सप्रेस- कोल्हापूर- धारवाड एक्सप्रेस- नांदेड- महानंदी एक्सप्रेस- तिरुपती- अमरावती व्हाया अकोला - विदर्भासाठी खास आकर्षण- कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणार- कोल्हापूर - व्हाया निपाणी- पुणे - नांदेड व्हाया लातूर- रांची- पुणे व्हाया विलासपूर - नागपूर- भोपाल व्हाया खंडवामुंबईसाठी ठाकुर्ली गॅस पॉवर स्टेशन मुंबईसाठी लोकलच्या 47 नव्या फेर्‍या सुरू करणार असल्याची घोषणा ममता दिदींनी केली. तसेच सर्व 9 डब्यांच्या गाड्या 12 डब्यांच्या करण्यात येणार आहे. हार्बर लाईनच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे- वाशी-पनवेलसाठी नव्या लोकलची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली. अंधेरी-बोरिवली-विरार नव्या गाड्याही सुरू होणार आहे. तसेच मुंबई- अलाहबाद, पुणे-अहमबाद दुरांतो एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई ते अहमदाबाद डबल डेकर एसी तसंच मनमाड-मुंबई एक्सप्रेस सुरू होणार आहे.- ठाकुर्ली गॅस पॉवर स्टेशन, गडचिरोली - बस्तर या दुर्गम भागात रेल्वे मार्ग टाकणार- मुंबई आणि उपनगरांसाठी लोकलच्या आणखी 47 नवीन फेर्‍या- मुंबई सेंट्रल - दिल्ली एसी दुरांतो- अलाबाहाद- मुंबई दुरांतो- पुणे- अहमदाबाद दुरांतो - नागपूर -मुंबई दुरांतो रोज- पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस- मुंबई- अहमदाबाद डबल डेकर एसी- मनमाड-मुंबई एक्स्प्रेस- नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस व्हाया पूर्णा, लातूर- मुंबई- चंदीगड एक्सप्रेस- मुंबई-अलाहाबाद एक्सप्रेस- मुंबई- इलाहाबद एक्सप्रेसरेल्वे अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य - प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ नाही- ऑनलाईन तिकीटे स्वस्त होणार- गरीबांसाठी 'इज्जत कार्ड' योजना सुरु करणार- सुरक्षिततेच्या दृष्टीनं देशपातळीवर हेल्पलाईन सुरु करणार- ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात 30 टक्के सवलत- ज्येष्ठ नागरिक महिलांसाठीची वयोमर्यादा आता 58 वर्षे- विद्यार्थ्यांसाठी जन्मभूमी एक्स्प्रेस सुरु करणार- इंफाळला पहिल्यांदाच रेल्वे पोहचणार- दुर्गम नक्षलग्रस्त भाग रेल्वेनं जोडणार- ठाकुर्लीत 700 मेगावॅट गॅस पॉवर निर्मिती प्रकल्प उभारणार- जम्मूमध्ये रेल्वेब्रिज उभारणीचा कारखाना - बहुपयोगी गो इंडिया स्मार्ट कार्ड सुरु करणार- 6 व्या वेतन आयोगामुळं रेल्वेच्या खर्चात 97 टक्क्यांनी वाढ- रेल्वे अपघात कमी झालेल्या राज्यांना विशेष सुविधा देणार- ज्या राज्यात रेल रोको होणार नाही, त्यांना 2 नव्या रेल्वेगाड्या आणि 2 नवे प्रकल्प देणार - सिंगूरमध्ये मेट्रोचे रेल्वे डबे उभारणीचा कारखाना- नंदीग्राममध्ये रेल्वेसाठी औद्योगिक पार्क उभारणार काही महत्वपूर्ण घोषणा- टेक्नोलॉजी एक्सप्रेसने सर्व आयआयटी जोडणार- लष्करातल्या 16 हजार माजी सैनिकांची रेल्वेत भरती करणार- ऑल इंडिया सुरक्षा हेल्पलाईन सुरु करणार. आयआयटीएसच्या मदतीने ऑन लाईन तिकीट प्रणाली अद्ययावत करणार- इंटरनेट बुकिंगसाठी आता 20 रूपयांएवजी 10 रूपये लागणार- रिझर्वेशन चार्जेस स्वस्त : एसी साठी 10 रूपये तर नॉन एसीसाठी 5 रूपये कपात- देशभरात सर्व ठिकाणी प्रवास करण्यासाठी गो इंडिया स्मार्ट कार्ड योजना सुरू करणार- रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न- उत्तम रेल्वे सेवा देणार्‍या राज्यांना पुरस्कार- देशातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग (फाटक) बंद करणार- गार्ड नसलेल्या सर्व रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा गार्डची नेमणूक करणार- आणखी तीन रेल्वे झोन ऍण्टी कोल्युजन डिव्हाईस करणार- टॅक्सफ्री बॉण्ड च्या माध्यमातून 10 हजार कोटी उभारणार- सुरक्षेला रेल्वेची सर्वोच्च प्राधान्य- पंतप्रधान रेल्वे विकास योजनेची घोषणा, या योजनांमध्ये रेल्वेच्या सर्व प्रकल्पांचा समावेश- रेल्वेच्या माध्यमातून सामाजिक विकास दुर्गम भागांना रेल्वेनं जोडणार- प.बंगालमधल्या सिंगुर इथं मेट्रो कोच फॅक्टरी- रेल्वे बेघरांसाठी 10000 घरे बांधणार- गरींबांसाठी इज्जत तिकिट : 25 रुपयात 100 किलोमीटर प्रवासाची मुभा- टॅक मशीन इंडस्ट्री नंदिग्राम येथे स्थापन करणार. रेल्वेचे स्वत:चे पॉवर प्लांट सुरु करण्याची योजना. ठाकुर्ली येथे रेल्वे स्वत:चा पॉवर प्लांट सुरु करणार.- पूर्वोत्तर राज्यांना रेल्वेनं जोडण्याची योजना- जम्मू आणि काश्मीर मध्ये रेल्वे फॅक्टरी सुरू कऱणार- जम्मूला रेल्वे आणि टनेल इन्स्टिट्यूट स्थापन करणार- जम्मू येथे टनेल आणि ब्रिज इंजिनीअरिंग डेवलपमेंट इस्टिट्यूट स्थापन करणार- रायबरेली येथे कोच फॅक्टरीचं काम युद्धपातळीवर सुरु. रायबरेलीच्या रेल्वे कोच फॅक्टरीतून तीन महिन्यात उत्पादन सुरू होणार.- मागील रेल्वेबजेटमधील घोषणेची अंमलबजावणी- रेल्वे बोगीच्या निर्मितीसाठी नवीन कारखाने उभारणार- प्रवाशांच्या सोयीसाठी नवे रेल्वे कोच तयार करणारे प्रकल्प उभारणार- कोळसा आणि कच्चे लोखंड उत्खनन करणार्‍या क्षेत्रांना रेल्वेने जोडण्यावर भर देणार- रेल्वेला लोकांचा चेहरा देण्याचं काम करणार- वर्षभरात रेल्वेत 57 हजार 630 कोटींची गुंतवणूक- वर्षभरात रेल्वे अपघातांचं प्रमाण कमी झालंय

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading