#वर्धा

Showing of 560 - 573 from 620 results
शेतकर्‍यांच्या 77 मारेकर्‍यांवर कारवाई

बातम्याApr 22, 2011

शेतकर्‍यांच्या 77 मारेकर्‍यांवर कारवाई

22 एप्रिलशेतकर्‍यांचे मारेकरी नावाची विशेष मोहीम आम्ही 12 एप्रिलपासून सुरु केली. पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाला. त्यातील दोषींवर कधी कारवाई होणार? यासाठी आम्ही ही मोहीम सुरु केली. सुरवात झालीय ती कृषी विभागापासून. कृषी विभागाच्या 405 अधिकार्‍यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात या नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. आता तब्बल चार महिन्यांनी यापैकी 77 अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे अंतिम आदेश काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली. ही कारवाई विविध स्वरुपची असेल. प्रमोशन थांबवणे, बडतर्फी, निलंबन आणि आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. याशिवाय, अवजारांच्या पुरवठादार असलेल्या राज्य सरकारच्या तिन्ही नोडल एजन्सीसच्या अधिकार्‍यांचीही पुढील दीड महिन्यात चौकशी केली जाणार आहे. पण यापैकी काही अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे. त्यामुळे सरकारच्या कारवाईला दिरंगाई झाली असल्याचाही आरोप करण्यात येतोय.कृषी विभागासोबतच अन्य विभागांमध्येही भ्रष्टाचार झाला. कृषी अधिकार्‍यांवर कारवाई हा एक भाग झाला. पण भ्रष्टाचाराला आणखी कोणकोण जबाबदार होते? हा प्रश्नही महत्वाचा आहे. एक नजर टाकूया पॅकेजच्या तरतुदीवर आणि त्यासाठीच्या जबाबदार व्यक्तींवर.... पॅकेजमधील तरतूद- पीएम पॅकेज 3,750 कोटी-सीएम पॅकेज 1,075 कोटीशेतकर्‍यांचे मारेकरी जबाबदार कोण ?- पॅकेजमधील सिंचनासाठीचा निधी 3200 कोटी रुपये-तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार-जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष-अजित निंबाळकर- मग हा निधी कुठे मुरला?- विदर्भातला अनुशेष अजूनही दूर झाला नाही-10 लाख 93 हजार 730 हेक्टर जमिनीचा अनुशेष बाकी आहे.- कृषी विभागासाठीचा निधी 150 कोटी- उत्कृष्ट दर्जाच्या बियाण्यांसाठी 200 कोटींची तरतूद- तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब थोरात- कृषी विभागाचे तत्कालीन सचिव नाना पाटील- महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ (एमएआयडीसी)- अवजारांचा 80% पुरवठा- महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात- महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक- प्रदीप व्यास - तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख- उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील- वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे- पाच वर्षांत बदललेले 10 संचालक-मिशनवर होती पॅकेज अंमलबजावणीची जबाबदारी- सिंचनाव्यतिरिक्त 310 कोटी खर्च-तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री अनिस अहमद- तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते- पाणलोट क्षेत्रासाठीचा निधी गेला कुठे?-वनखात्यालाही मिळाला होता निधी पश्चिम विदर्भातल्या सहा जिल्ह्यांत गेल्या पाच वर्षांत आठ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे हे सत्र सरकारसाठी नवं राहिलेलं नाही. पण शेतकर्‍याचा जाणारा प्रत्येक जीव हा आपल्या समाजासमोर केलेला आक्रोश आहे. सरकारला तो ऐकू येत नाही. पॅकेजच्या माध्यमातून 2005 मध्ये केलेली मलमपट्टी ही तात्पुरती ठरली आणि निरुपयोगीही. म्हणूनच आजही विदर्भातला कास्तकरी नाडला गेला. 21 मार्च 2011 रोजी राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार करणार्‍या 405 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच यावेळी 50 अधिकार्‍यांचे निलंबनाचे आदेश ही देण्यात आले होते मात्र कारवाई अजून ही करण्यात आली नाही. या पॅकेजसाठी बी. व्ही. गोपाळरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पॅकेज अहवालचं पोस्टमार्टेम केलं होतं.. पॅकेजमध्ये झालेल्या अंमलबजावणीतील भ्रष्टाचारावर त्यांनी अहवाल दिला होता. दरम्यान, याच भ्रष्टाचारासाठी कृषी विभागाने केलेल्या चौकशीमध्ये 405 अधिकार्‍यांना दोषी ठरवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ही यादी सरकार जाहीर करत नाही. आयबीएन लोकमतच्या हाती ही यादी लागली आहे. पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यातील कृषी अधीक्षकांची पहिली यादीतत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी- टी. एम. चव्हाण, बुलढाणा-पी. सी. सांगळे, बुलढाणा- शुद्धोधन सदार, अकोला- प्रल्हाद रंगराव पवार, वाशिम- डॉ. दिगंबर गणपत बकवाड, वाशिम- एस. जी. पडवळ, अमरावती- के. एस. मुळे, अमरावती-व्ही. व्ही. चव्हाळे, यवतमाळ- ए. एम. कुरील, यवतमाळ- बी. एम. ओरके, यवतमाळ- जी. अे. देवळीकर, यवतमाळ- व्ही. डी. लोखंडे, यवतमाळ- झिन्नुजी गणपतराव पळसुदकर, वर्धा- अशोक लोखंडे, वर्धा- अर्जुन तांदळे, वर्धाजिल्हा अधीक्षक आणि उपविभागीय अधिकार्‍यांची ही यादी आहे. आणि आता कोणकोणत्या वर्गातले किती अधिकारी या यादीमध्ये आहेत ? म्हणजे लक्षात येईल, सर्वच स्तरात भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहाराची कीड कुठेपर्यंत पोहचली. सरकारने अजूनही अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. सरकार या अधिकार्‍यांना आणि त्यांच्यावर असणार्‍या मंत्रालयातील सूत्रधारांना पाठीशी घालतंय. हेच आहेत शेतकर्‍यांचे मारेकरीजिल्हा कृषी अधिकारी - 15उपविभागीय कृषी अधिकारी - 26तालुका कृषी अधिकारी - 57मंडळ कृषी अधिकारी - 90कृषी पर्यवेक्षक - 88कृषी सहाय्यक - 128अनुरेखक - 1एकूण 405 अधिकारी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी - डी.एस. सोळंके, खामगाव (बुलढाणा)-एस.जी. भोसले, बुलडाणा- आर.एम. भराड, मेहकर (बुलढाणा)- पी.आर. पवार, मेहकर (बुलढाणा)- ए.के. मिसाळ, मेहकर (बुलढाणा)- डी.एस. सोळंके, मेहकर (बुलढाणा)- पी.के. लहाळे, बुलढाणा- टी.एम. चव्हाण, बुलढाणा- एल.आर. जवळेकर, बुलढाणा- व्ही.डी. भांदककर, अकोट (अकोला)- अनिल बोंडे, अकोला- साहेबराव कोंडीराम दिवेकर, वाशिम- प्रभाकर चव्हाण, वाशिम- बी.के. जेजूरकर, अचलपूर (अमरावती)- ए.एस. डोंगरे, अचलपूर (अमरावती)- एस. के. डोंगरे, अचलपूर (अमरावती)- एम.आर. जळमकर, अमरावती- एन.व्ही. ठाकरे, अमरावती- सु. ह. ठाकरे, अमरावती - व्ही.एस. ठाकरे, यवतमाळ- व्ही.व्ही. चवाळे, यवतमाळ- डी.बी. हुंगे, यवतमाळ- व्ही.बी. जोशी, यवतमाळ- जी.आर. सूर्यवंशी, यवतमाळ- लक्ष्मण तामागाढगे, हिंगणघाट (वर्धा)- गोपाळराव काळे, आर्वी (वर्धा)