#वर्धा

Showing of 547 - 560 from 614 results
वर्ध्यात साथीच्या आजाराचे थैमान

बातम्याSep 24, 2011

वर्ध्यात साथीच्या आजाराचे थैमान

24 सप्टेंबरवर्धा जिल्ह्यात गेल्या मागिल महिन्यापासून व्हायरल फीवर, चिकनगुनिया, हगवण या साथीच्या आजाराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत विविध साथींच्या आजाराने 500 च्या वर रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील आर्वी,आष्टी,कारंजा आणि वर्धा तालुक्यात साथीचा फैलाव झाला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रूग्णांची रीघ लागली आहे. रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.