#वर्धापन दिन

Showing of 79 - 86 from 86 results
रिपाइंचा आज 55 वा वर्धापन दिन

बातम्याOct 3, 2012

रिपाइंचा आज 55 वा वर्धापन दिन

03 ऑक्टोबररिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 55 वा वर्धापन दिन आज साजरा केला जातोय. यानिमित्ताने परळच्या कामगार मैदानावर कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा हजर असणार आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर हे तीनही नेते काय भाष्य करतायत यावरुनच महायुतीची पुढची दिशा स्पष्ट होईल.