#वडाळा

Showing of 170 - 183 from 185 results
मुंबईत मुसळधार पाऊस

बातम्याJul 3, 2010

मुंबईत मुसळधार पाऊस

3 जुलैमुंबईला आज पावसाने चांगलाचा तडाखा दिला. संध्याकाळी थोड्या वेळासाठी पावसाचा जोर ओसरला होता. पण रात्री पुन्हा एकदा शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभर झालेल्या पावसामुळे शनिवारी मध्य रेल्वेची वाहतूत विस्कळीत झाली होती. सायन, कुर्ला, परेल, करी रोड, वडाळा रोड या स्टेशनमध्ये ट्रॅक पाण्याखाली गेल्याने हार्बर आणि मध्य मार्गावरच्या लोकल चाळीस ते 45 मिनिटे उशिराने धावत होत्या. संध्याकाळी पावसाचा जोर ओसरल्यावर रेल्वेसेवा पूर्वपदावर आली. अनेक ठिकाणी नाले साफ न झाल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते. पण पाणी ओसरल्यावर रस्ते वाहतूकही सुरळीत झाली. मुंबईमध्ये आज झाडे किंवा भिंत कोसळल्याच्या कोणत्याही घटना आज घडलेल्या नाहीत. दरम्यान येत्या चोवीस तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.नवी मुंबईत पाणी साचलेनवी मुंबई या सुनियोजित शहरामध्येही पावसामुळे पाणी साचले. तुर्भे पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्येच तीन फुटापर्यंत पाणी साचले. पोलीस स्टेशनच्या संपूर्ण इमारतीमध्ये पाणीच पाणी झाल्याने पोलीस स्टेशनच्या लॉक अपमध्ये असलेल्या आरोपींनाही हलवण्याची वेळ पोलिसांवर आली. याशिवाय सर्व रेकॉर्ड्स आणि पोलीस स्टेशनचा कारभार एका छोट्या खोलीमध्ये हलवण्यात आला आहे. नवी मुंबईत आज दिवसभर पाऊस कोसळला. त्यामुळे सायन पनवेल महामार्गावरही दिवसभर ट्रॅफिक जॅम होते.