पिंपरी-चिंचवड, 16 जून : आपिंपरी चिंचवडमधील काही 'सत्यवानांनी' रविवारी वटपौर्णिमा साजरी केली. सांगवी परिसरातल्या काही पुरुषांनी एकत्र येऊन पत्नीप्रमाणे वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. मानवी हक्क समितीच्यावतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी वृक्षतोड थांबविण्यासह पर्यावरण रक्षणाची आणि 'हीच पत्नी सात जन्म मिळू दे' अशी शपथ घेतली.