#वजन

Showing of 599 - 612 from 651 results
अण्णांची प्रकृती खालावली ; हॉस्पीटलमध्ये जाण्यास नकार

बातम्याAug 23, 2011

अण्णांची प्रकृती खालावली ; हॉस्पीटलमध्ये जाण्यास नकार

23 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आज त्यांची तब्येत जास्त क्षीण झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. पण अण्णांनी हॉस्पीटलमध्ये जायला स्पष्ट नकार दिला. अण्णांना त्यांच्या समर्थकांसोबत रामलीला मैदानावरच राहायचंय. त्यामुळे डॉक्टरांनी स्टेजवरच त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला. पण अण्णांनी सलाइन लावायलाही नकार दिला. अण्णांचे वजन जवळपास 5.6 किलोंने कमी झालं. अण्णांचे वजन पाच किलोनं कमी झालं आहे. पण स्टेजवर बसलेल्या अण्णांकडे लक्ष दिलं तर उपोषणाचा अण्णांच्या प्रकृतीवर परिणाम हे स्पष्टपणे जाणवतं आहे. अण्णांचं उपोषण 16 ऑगस्टला सुरु झालं. पण तेव्हा अण्णा रामलीला मैदानात उपोषणाला बसले ते 18 ऑगस्टपासून. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा आठवडा आहे. आठवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि कालपासून अण्णांची तब्येत कालपासून थोडीशी खालावली आहे. अण्णांच्या प्रकृतीबद्दल सरकारला चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.