लोणावळा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 21 results
VIDEO : अवघ्या 100 मीटर अंतरावर डेक्कन क्वीन आणि लोकल, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

व्हिडीओNov 29, 2019

VIDEO : अवघ्या 100 मीटर अंतरावर डेक्कन क्वीन आणि लोकल, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

पुणे, 29 नोव्हेंबर : पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन लोणावळा स्टेशनच्या अलीकडे 5 किलोमीटर अंतरावर आल्यावर त्याच रुळावर आणखी एक ट्रेन आली. या दोन्ही गाड्यांमध्ये अवघे 100 मीटर अंतर होते. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, हा प्रकार का घडला, कुणाची नेमकी चूक हे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुण्याहून मुंबईला डेक्कन क्वीनने प्रवास करणारे सजग नागरिक मंचचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी news 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. यावर रेल्वे प्रशासनानं हा सिग्नल प्रणालीचा भाग असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ऑटोमॅटिक सिग्नल ब्लॉक सिस्टिम गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सुरू आहे, यामुळे वेळ वाचतो आणि गाड्या एकमेकांमागे थांबतात. त्यात काळजी करण्याचं कारण, नसल्याचं रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.