#लोणावळा

Showing of 118 - 129 from 129 results
बिग बॉसच्या घरात पामेला अँडरसन

बातम्याNov 15, 2010

बिग बॉसच्या घरात पामेला अँडरसन

15 नोव्हेंबरकलर्स चॅनेलवरील बिग बॉस सिझन 4 मध्ये रोज नवीन नवीन घडामोडी घडत असतात. पण बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आता एक सुखद धक्का बसणार आहे. बिग बॉसच्या घरात मंगळवारी हॉलिवूड स्टार पामेला अँडरसन सेलिब्रिटी गेस्ट म्हणून येणार आहे . पामेला या शो मध्ये सहभागी होण्यासाठी आज भारतात येत आहे. आणि मंगळवारी लोणावळा इथे असलेल्या बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री पामेला अँडरसन बिग बॉसच्या घरात केवळ तीन दिवसच राहणार आहे. बेवॉच या टीव्ही सिरियलमधून अख्ख्या जगाला आपल्या अदांनी घायाळ करणारी पामेला आता बिग बॉसच्या घरी तीन दिवसात काय धमाल करते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. पामेला ही बिग बॉसच्या घरातील तिसरी परदेशी पाहुणी आहे. या आधी जेड गुडी आणि क्लोडिया यांचा बिग बॉसच्या शो मध्ये सहभाग होता.