#लोअर परळ

Showing of 1 - 14 from 34 results
VIDEO: लोअर परळचा पूल पाडण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण; वाहतूक पूर्ववत

व्हिडिओFeb 3, 2019

VIDEO: लोअर परळचा पूल पाडण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण; वाहतूक पूर्ववत

मुंबई, 3 फेब्रुवारी : पश्चिम रेल्वेनं लोअर परळ स्थानकावरील पुल पाडण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण केलं आहे. निर्धारीत वेळेच्या 90 मिनिटे आधीच हे काम पूर्ण करण्यात आलं. यानंतर तब्बल 10 तासानंतर चर्चगेट इथून लोकल वाहतुकीला सुरूवात झाली. या कामासाठी 5 मोठ्या महाकाय क्रेनचा वापर करण्यात आला. पूल पाडण्याच्या कामामुळे सुमारे 200 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तर चर्चगेटपर्यंत येणारी लोकल वाहतूक दादरपर्यंत करण्यात आली होती. वेळेआधीच काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. लोअर परळ स्थानकाजवळील पूल गंजल्याचं स्पष्ट झाल्यानं 'आयआयटी'सह रेल्वेच्या संयुक्त समितीनं पूल धोकादायक स्थितीत असल्याचं सांगितलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close