Elec-widget

#लायन

Showing of 40 - 44 from 44 results
रेकॉर्डब्रेक कामगिरी

बातम्याOct 10, 2010

रेकॉर्डब्रेक कामगिरी

10 ऑक्टोंबरकॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने नवा रेकॉर्ड केला आहे. कॉमनवेल्थमध्ये सर्वाधिक गोल्ड मेडल जिंकण्याचा स्वत:चा रेकॉर्ड भारताने मागे टाकला आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 29 गोल्ड मेडल सह एकुण 73 मेडल्स जिंकली आहे. यात भारतीय शुटर्सचा तब्बल 13 गोल्ड मेडल्सचा वाटा आहे. याशिवाय भारतीय कुस्तीपटू, तिरंदाज आणि वेटलिफ्टर्सनंही महत्वाचा वाटा उचलला आहे. 20 सिल्व्हर तर 22 ब्राँझ मेडल्सही भारताने जिंकली. याआधी 2002च्या मँचेस्टर कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 69 मेडल जिंकले होते. यात 30 गोल्ड, 22 सिल्व्हर आणि 17 ब्राँझ मेडलची कमाई केली होती. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वाधिक 30 मेडलचा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारताला आता आणखी 1 गोल्ड मेडलची गरज आहे. 2006 च्या मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 22 गोल्ड सह एकुण 50 मेडल्स जिंकली होती. टेनिसमध्ये सोमदेव देवबर्मन विजयी टेनिसमध्ये अखेर भारताने आपले पहिले गोल्ड जिंकले आहे. पुरुषांच्या सिंगल्समध्ये अव्वल सिडेड सोमदेव देवबर्मनने गोल्ड पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग जोन्सचा त्याने दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी डबल्समध्ये सोमदेवला मेडलने हुलकावणी दिली होती. सेमी फायनलमध्ये सोमदेव आणि रोहन बोपान्ना जोडीला पराभव पत्करावा लागला होता. पण त्याची भरपाई सोमदेवने आज केली. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी जोन्सला फारशी संधी दिली नाही. पहिला सेट त्याने 6- 4ने जिंकला. आणि दुसरा सेटही 6-2ने जिंकत गोल्ड मेडल पटकावले.हॉकीमध्ये भारताची पाकिस्तानवर 7-4 ने मातकॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय हॉकी टीमची कामगिरी जबरदस्त होते. भारताच्या पुरुषांच्या टीमने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाक टीमचा 7-4 ने पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या मॅचमध्ये भारताने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. खेळाच्या दुसर्‍याच मिनिटाला पहिला गोल संदीप सिंगने केला त्यानंतरही भारताने हल्ले सुरुच ठेवले. आणि आणखी दहा मिनिटातच भारताचे आणखी तीन गोल बोर्डवर झळकले. पहिल्या हाफच्या शेवटी पाकिस्तानला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. आणि त्यांनी आघाडी एका गोलने कमी केली. दुसर्‍या हाफमध्येही भारताने वर्चस्व राखत तीन गोल केले आणि मॅच जिंकली. या विजयाबरोबरच भारताने ए गटातून सेमी फायनल गाठली. याच गटातून भारतोबरोबरच ऑस्ट्रेलियानेही सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या गटात भारताने आतापर्यंत तीन मॅच जिंकल्या आणि एक गमावली. भारतीय शुटर्सच्या कामगिरीत आणखी एका गोल्डकॉमनवेल्थ गेम्सच्या सातव्या दिवशीही भारतीय शुटर्सने आपल्या कामगिरीत आणखी एका गोल्ड मेडलची भर घातली. शुटींगमध्ये भारताच्या हरप्रीत सिंगने गोल्ड मेडल पटकावले आहे. हरप्रीतने सेंटर फायर पिस्तुल प्रकारात गोल्ड पटकावले. तर याच प्रकारात विजय कुमारने सिल्व्हर मेडल पटकावले. शुटिंगमध्ये भारताच्या खात्यात आता 13 गोल्ड मेडलची नोंद झाली. याशिवाय 8 सिल्व्हर आणि 3 ब्राँझ मेडलचीही कमाई केली.सुशीलकुमारचं गोल्डन यश10.10.10 हा मॅजिकल दिवस भारतीय कुस्तीसाठी ठरला लकी, कॉमनवेल्थमध्ये भारतीय कुस्तीने 10 गोल्ड मेडल्स पूर्ण केली आहे. 66 किलो वजनी गटात भारताच्या सुशिल कुमारने गोल्ड मेडल पटकावले. सुशिल कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रीच बार्नसचा 2-0, 5-0 असा पराभव करत हे गोल्ड मेडल पटकावले. याआधी सेमी फायनलमध्ये सुशिलने गांबियाच्या फामरा जॉर्जाेव्हला फक्त 9 सेंकदमध्ये चीतपट करत फायनलमध्ये धडक मारली होती. 84 किलो वजनी गटात अनुज कुमारला मात्र सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा मोहम्मद इनामने फायनलमध्ये अनुजचा पराभव केला. पहिला गेम भारताच्या अनुजने जिंकला तर दुसरा गेम पाकिस्तानच्या पेहलवानाने आपल्या नावावर केला. तिसर्‍या गेममध्ये पॉईंट्स मिळवता आले नाही. त्यामुळे अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये टॉसवर निर्णय लागला. आणि पाकिस्तानच्या इनामने ही मॅच जिंकत गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरले. फ्रिस्टाईल 55 किलो वजनी गटात भारताच्या अनिल कुमार मानने ब्राँझ मेडल पटकावले. अनिल कुमारने वेल्सच्या ग्रेग पेलिंगचा पराभव करत ब्राँझवर कब्जा केला. सुपर हेविवेट गटात भारताच्या जोगिंदर कुमारनं सिल्व्हर मेडल जिंकले. 120 किलो वजनी गटाच्या या लढतीत कॅनडाच्या अर्जन भुल्लारने जोगिंदरचा पराभव केला.तिरंदाजीत राहुल बॅनर्जीला गोल्ड मेडलतिरंजादीत भारताने आज आणखी दोन गोल्ड मेडलची कमाई केली. तर एक ब्राँझ मेडलही जिंकले. पुरूषांच्या रिकर्व्ह प्रकारामध्ये राहूल बॅनर्जीने गोल्डवर कब्जा केला. अटीतटीच्या मॅचमध्ये राहूलने कॅनडाच्या लायन जेसनचा 6-5ने पराभव केला. याच प्रकारात भारताच्या जयंता तालुकदारने ब्राँझ मेडल पटकावले. जयंताने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यु ग्रेचा 6-4 ने पराभव केला. भारतीय महिलांची तिरंदाजीत चांगली कामगिरी पुरूषांच्या तिरंदाजीबरोबर भारतीय महिलांनीही तिरंदाजीत चांगली कामगिरी केली. भारताच्या दिपीका कुमारीने तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल पटकावले. महिलांच्या वैयक्तीक रिकर्व प्रकारात दिपिकाने हे गोल्ड पटकावले. दिपीकाने इंग्लंडच्या विलसनचा पराभव केला. तर याच प्रकारात भारताच्या डोला बॅनर्जीने वैयक्तीक रिकर्व प्रकारात ब्राँझ मेडल पटकावले. डोलाने मलेशियाच्या ऍनाचे आव्हान मोडीत काढत ब्राँझ खिशात घातले. डोला बॅनर्जीही राहूल बॅनर्जीची बहिण आहे.