#लक्ष्मीपुरी

VIDEO : मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी कायपण, पठ्यांनी चोरल्या 12 दुचाकी

महाराष्ट्रJan 24, 2019

VIDEO : मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी कायपण, पठ्यांनी चोरल्या 12 दुचाकी

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 24 जानेवारी : मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी कोण कोण काय करेल सांगता येत नाही. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात मुलींवर इम्प्रेशन मारणाऱ्यांना थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळी मोटारसायकल घेऊन जाणार्‍या दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. रोहित खरळकर आणि शुभम घाटगे अशी त्यांची नावं आहेत. या दोघांकडून चोरीच्या 12 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, एका घरफोडीच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे. वाठार परिसरातील 'सुरज्या-गोंद्या' या सराईत टोळीतील अल्पवयीन गुन्हेगार म्हणून यापूर्वी रेकॉर्डवर आलेला रोहित खरळकर याला अटक झाली आहे. त्याच्यावर यापूर्वीही 6 ते 7 गुन्हे दाखल आहेत. त्याने शुभम घाटगे याच्या मदतीने शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गांधीनगर, वडगाव, शिरोली एमआयडीसी तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. हे दोघे कोल्हापुरात चोरीची मोटारसायकल विकण्यास येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. यावरून ताराबाई पार्कात सापळा रचण्यात आला आणि ही कारवाई करणयात आली.