रिलायन्स

Showing of 352 - 365 from 384 results
'पा'च्या ऑरोबद्दल उत्सुकता

बातम्याDec 1, 2009

'पा'च्या ऑरोबद्दल उत्सुकता

1 डिसेंबर 'पा' सिनेमा 4 तारखेला रिलीज होतोय. पण त्याआधीच सगळ्यांना उत्सुकता आहे ती ऑरोबद्दल. बिग बी या सिनेमात ऑरो या 12 वर्षाच्या मुलाची भूमिका साकारतायत आणि अभिषेक त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. 'पा'ची निर्मिती हा एक वेगळाच विषय. कारण खूप दिवसांनी या सिनेमाच्या निर्मितीत एबीसीएल उतरलंय. आणि त्यांच्यासोबत आहे रिलायन्स. सिनेमाचं डिस्ट्रिब्युशन करणार रिलायन्स कंपनी. 'पा'चं प्रमोशनही जोरात सुरू आहे. 'पा' सिनेमाची निर्मिती केलीय ए.बी.सी.एल. म्हणजेच अमिताभ बच्चन कॉर्पोरेशननं.या सिनेमाचं बजेट आहे 15 कोटी रुपये. एकीकडे बॉलिवूडचे सिनेमे 50 कोटींच्या बजेटमध्ये जात असताना 'पा'ची निर्मिती फक्त 15 कोटीत करणं थोडं कठीणचं होतं. मात्र ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली ती अभिषेक बच्चननं. एबीसीएलला अगोदरच्या सिनेमांचा अनुभव असल्यानं हे काम सोपं झालं असं मत अभिषेकनं व्यक्त केलं. शुटींग दरम्यान प्रॉडक्शनची पूर्ण जबाबदारी पेलली अभिषेकने तर आता सिनेमाच्या पूर्ण मार्केटींगचा फंडा बघतेय ती ऐश्वर्या राय-बच्चन. आतापर्यंत 'पा'चं मार्केटींग आणि प्रमोशन ज्या पद्धतीनं केलं गेलंय त्यावरुन ऐश्वर्याची मार्केटींग स्कील चांगलीच दिसून आली आहेत. 'पा'च्या मार्केटींगचा फंडाअमिताभचा हा लुक सगळ्यांनाच चक्राऊन टाकणारा होता. आणि हेच या सिनेमाचं मुख्य भांडवल होतं. फोटोनं वातावरण निर्मिती केली आणि मग लाँच झाला 'पा'चा फर्स्ट लुक. बिग बीला आपण अनेक लुक्समध्ये पाहिलंय मात्र त्याचा हा लुक अतिशय वेगळा आणि धक्कादायक होता. फर्स्ट लुकमध्येच ऑरो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि क्षणार्धात त्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये जाणवू लागला. त्यानंतर प्रमोशनच्या युद्धात अभिषेक उतरला आणि बिग एफ.एम. सारख्या रेडीओस्टेशन्सला भेट देऊन त्यानंही मार्केटींग सुरु केलं. अभिषेकबरोबर विद्या बालनही प्रमोशनसाठी पुढं आली. अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारल्यानं तिची एक्साएटमेंट लपत नव्हती. ते अमिताभ बच्चन नव्हतेच. एकदा का त्यांनी मेकअप च़ढवला की त्यांचं वागणंच बदलून जायचं. एकीकडे अभिषेक आणि विद्या बालन ही 'पा'ची आघाडीची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये बिझी असताना 'पा'चा रिअल हिरो म्हणजेच बिग बी या फ्रेममध्ये कुठेच दिसला नाही. ही सुद्धा एक मार्केटींगचीच खेळी असु शकते कारण व्हिज्युअल मीडियासमोर येणं टाळणारा अमिताभ रेडिओवरून मुलाखती देतोय आणि चॅनेल्सशीही तो फोनवरुनच बोलतोय. याबरोबरच ब्लॉगवरुनही अमिताभ लोकांशी संवाद साधतोय. ब्लॉगवरही पा...अमिताभच्या ब्लॉगवर आजपर्यंत हरीवंशराय बच्चन यांच्या कवितांचं दर्शन व्हायचं मात्र आता ती जागा घेतलीय पा सिनेमातल्या ऑरोने. 4 डिसेंबरला मी तुम्हाला भेटायला येतोय अशा आशयाची वाक्य या ब्लॉगच्या सुरुवातीलाच लिहिलीयत. त्याचबरोबर इथं सिनेमा रिलीजचा काऊंटडाउनही सुरु आहे. ब्लॉगच्या माध्यमातून बिग बी नेहमीच आपल्याशी बोलत असतो, त्याच्या गोष्टी शेअर करत असतो मात्र त्याचे आत्ताचे जे ब्लॉग आहेत त्यावर 'पा' ची छाया स्पष्ट दिसते. 'पा' विषयी त्याचा दिवस नेमका कसा होता, पाबद्दल त्याला किती उत्सुकता आहे, अशा अनेक गोष्टी त्यानं या ब्लॉगवर लिहिल्यात. पाच्या प्रिमियरबद्दल त्याचं शाहरुख खान आणि आमीर खानशी झालेलं बोलणंही ब्लॉगवर पहायला मिळेल. एकूणच बिग बीचा ब्लॉगही 'पा'मय झालाय. 'पा' सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय.

ताज्या बातम्या