रिलायन्स

Showing of 287 - 300 from 354 results
टाटा, रिलायन्सच्या प्रकल्पांसाठी बेकायदेशीरपणे भूसंपादनाचा आरोप  !

बातम्याApr 28, 2011

टाटा, रिलायन्सच्या प्रकल्पांसाठी बेकायदेशीरपणे भूसंपादनाचा आरोप !

28 एप्रिलरायगडमध्ये टाटा आणि रिलायन्स यांच्या ऊर्जाप्रकल्पांसाठी बेकायदेशीरपणे भूसंपादन होत असल्याचा आरोप अलीबाग तालुक्यातील शेतकर्‍यांनी केला आहे. याविरोधात या शेतकर्‍यांनी नवी मुंबईतील कोकण भवन येथे आंदोलन सुरू केलं आहे. रिलायन्सच्या 4000 मेगावॅट आणि टाटा पॉवरच्या 2400 मेगावॅट वीजर्निमिती प्रकल्पासाठी सुमारे 20 गावांची जमीन संपादन करण्यात येतेय. ही सर्व जमीन सुपीक असूनही सरकार ही जमीन बेकायदेशीररित्या या दोन प्रकल्पाला देत असल्याचा गावकर्‍यांचा आरोप आहे. ही जमीन संपादन करणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करावे आणि या जमिनीचा सर्व्हे व्हावा अशा मागण्यांसाठी रायगड ते नवी मुंबई असं आंदोलन करण्यात आलं आहे.