#रिक्षाचालक

Showing of 27 - 40 from 122 results
VIDEO : रिक्षाचालकानं चक्क पोलिसाच्याच डोक्यात घातली मातीची कुंडी!

व्हिडिओOct 1, 2018

VIDEO : रिक्षाचालकानं चक्क पोलिसाच्याच डोक्यात घातली मातीची कुंडी!

उल्हासनगर, 1 ऑक्टोबर : ट्राफिक जॅममध्ये अडकलेल्या रिक्षा चालकाने चक्क एका पोलिसाच्या डोक्यात मातीची कुंडी घालून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. यात पोलिसांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुदाम चौधरी हे दुचाकीहून गुरुवारी रात्री उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या सतरमदास हॉस्पिटलच्या रस्त्यावरून जात असताना ट्राफिक जॅममध्ये फसले. या वेळी ट्राफिक जॅममध्ये त्याच्या दुचाकीच्या मागे एक रिक्षाचालक सतत हॉर्न वाजवत होता. सुदाम यांनी त्या रिक्षा चालकाला पुढे ट्राफिक जॅम आहे तुला जायचे असेल तर जा, असे सांगितले. याचा राग आल्याने रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी शेजारी असलेली मातीचे कुंडी सुदाम चौधरी यांच्या डोक्यात घातली आणि त्यांना रक्त बंबाळ केले. यात पोलीस सुदाम चौधरी हे जखमी झाले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.