#राहुल गांधी

Showing of 2380 - 2393 from 2520 results
टीम अण्णांना विरोधकांचा 'महा'पाठिंबा

बातम्याDec 11, 2011

टीम अण्णांना विरोधकांचा 'महा'पाठिंबा

11 डिसेंबरसक्षम लोकपाल विधेयक मंजूर होण्यासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं. जंतरमंतरवर अण्णांनी आज केलेल्या एक दिवसाच्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि हे आंदोलन आज आणखी एका अर्थाने ऐतिहासिक ठरलं कारण आज जवळपास सर्वच विरोधी पक्षांच्यानेत्यांनी जंतरमंतरवर येऊन आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. टीम अण्णांच्या सर्वच मागण्यांना भाजपचा पाठिंबालोकपालबाबत टीम अण्णांनी केलेल्या जवळपास सगळ्या मागण्यांना भाजपने पाठिंबा दिला. त्याचबरोबर संसदेने देशाला दिलेले वचन स्थायी समितीने पाळलेलं नाही असा आरोपही अरुण जेटली यांनी केलंय. जंतरमंतरवर झालेल्या महाचर्चेत अरुण जेटली यांनी भाजपची ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी नागरिकांची सनद, कनिष्ठ कर्मचारी, पंतप्रधानपद आणि सीबीआय लोकपालच्या कक्षेतच पाहिजे या जनलोकपालच्या सर्व मुख्य मागण्यांना भाजपचा पाठिंबा दिला आहे. कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार लोकपालच्या कक्षेत असावा - वृंदा करातलोकपालवरील महाचर्चेत आपली भूमिका मांडताना मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार लोकपालच्या कक्षेत पाहिजे अशी जोरदार मागणी केली. त्याचबरोबर सरकारी लोकपाल कमकुवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदारांचे अभिव्यक्ती स्वतंत्र कायम ठेवून खासदारांना लोकपालच्या कक्षेत आणलं पाहिजे. तसेच पंतप्रधानपद, सीबीआयही लोकपाल अंतर्गत आले पाहिजेत या जनलोकपालमधील मागण्यांना वृंदा करात यांनी पाठिंबा दिला. तर नागरिकांची सनद, आणि न्यायपालिकेतही भ्रष्टाचार यासाठी वेगळे कायदे केले जावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं केली. टीम अण्णांनी हट्ट धरु नये - ए. बी. बर्धनभारतीय कम्युनिस्ट पक्षानंही आज जनलोकपाल विधेयकातील अनेक मागण्यांना आपला पाठिंबा दिला. त्यात कनिष्ठ कर्मचार्‍यांचा मुद्दा, पंतप्रधानपद, सीबीआय हे लोकपालच्या अंतर्गत असावेत अशी भूमिका भाकप नेते ए. बी. बर्धन यांनी मांडली. तर न्यायपालिकेसाठी स्वतंत्र कायदा केला पाहिजे असंही भाकपने आजच्या महाचर्चेत स्पष्ट केली. एवढंच नाही तर यावेळी ए बी बर्धन यांनी टीम अण्णांनाही खडे बोल सुनावले. आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे असा हट्ट धरू नये. त्यांनीही आपली भूमिका लवचिक ठेवली पाहिजे. दुसर्‍यांनाही ऐकून घेतलं पाहिजे अशा शब्दात बर्धन यांनी आपली भूमिका मांडली. सीबीआयचा सरकारकडून दुरुपयोग होतो - शरद यादवसंसदेनं मंजूर केलेला प्रस्ताव स्थायी समितीनं स्वीकारला नाही. मात्र तो मान्य केलाच पाहिजे. संसदेच्या प्रस्तावात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही अशा शब्दात संयुक्त जनता दलाने स्थायी समितीवर टीका केली. सीबीआयचा सरकारकडून दुरुपयोग होतोय. त्यामुळे सीबीआय लोकपालच्या कक्षेत यायला हवं अशी मागणी जंतरमंतरवर झालेल्या महाचर्चेत बोलताना शरद यादव यांनी केली. सोनिया आणि राहुल गांधी केंद्रातल्या भ्रष्टाचारावर गप्प का ? - नायडूलोकपालसंदर्भातील अण्णांच्या मागण्यांना तेलुगु देसमने पाठिंबा दिला. जंतरमंतरवरील महाचर्चेत तेलुगु देसमचे यरन नायडू यांनी पक्षांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सोनिया आणि राहुल गांधी उत्तर प्रदेशातील भ्रष्टाचाराबद्दल बोलतात पण केंद्रातल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाहीत असा आरोप केला. भाजपची भूमिका- पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत हवं- सीबीआय लोकपालच्या कक्षेत हवं- कनिष्ठ नोकरशाही लोकपालच्या कक्षेत हवी- नागरिकांच्या सनदेलाही पाठिंबासीपीएमची भूमिका- पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत हवेत- कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार लोकपालच्या कक्षेत पाहिजे - खासदार लोकपालच्या कक्षेत हवेत- न्यायपालिका लोकपालच्या कक्षेत नको- न्यायापालिकेसाठी स्वतंत्र विधेयक हवं- नागरिकांच्या सनदेसाठी वेगळं विधेयक अकाली दलाची भूमिका- पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत हवेत- कनिष्ठ नोकरशाही लोकपालच्या कक्षेत हवी- संयुक्त जनता दलाची भूमिका- सगळे सरकारी कर्मचारी- लोकपालच्या कक्षेत हवेत- लोकपालवर संसदेत चर्चा करायला आम्ही तयार- गरज असल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवा- लोकपालवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा- सीबीआयला सरकारपासून मुक्त करासमाजवादी पक्षाची भूमिका- पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत हवेत- कनिष्ठ नोकरशाही लोकपालच्या कक्षेत हवी- जनलोकपालमध्ये अल्पसंख्याकांचं प्रतिनिधीत्व असलं पाहिजे- सरकारी लोकपाल सक्षम नाहीNCPRI ची भूमिका- लोकपाल सर्वशक्तिमान होऊ नये- सीबीआय लोकपालच्या कक्षेत पाहिजे- पण त्याला अमर्याद अधिकार नको- त्याच्यावर काही नियंत्रण पाहिजे- पंतप्रधानही काही अटींवर लोकपालच्या कक्षेत पाहिजे