#राहुल गांधी

Showing of 2367 - 2380 from 2559 results
मोदी स्वहितासाठी सत्तेचा वापर करता -राहुल गांधी

बातम्याDec 11, 2012

मोदी स्वहितासाठी सत्तेचा वापर करता -राहुल गांधी

11 डिसेंबरगुजरातच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्याच्या 87 जागांसाठी 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये तीन सभा घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. नरेंद्र मोदी गुजरातच्या जनतेचा नाही तर फक्त स्वत:चा विचार करतात. स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सत्तेचा वापर करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी व्हावी, असा प्रयत्न मोदींनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच केला. पण काँग्रेसनं हा थेट संघर्ष टाळला. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र राहुल गांधींनी सभा घेत मोदी सरकारवर कडाडून टीका केली.