#राहुल गांधी

Showing of 2354 - 2367 from 2550 results
राहुल गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

बातम्याJan 19, 2013

राहुल गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

19 जानेवारीराहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेत. जयपूरमध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसनं एकमताने हा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी राहुल यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. राहुल गांधी आता काँग्रेसमध्ये नंबर 2 च्या पदावर विराजमान झाले आहे. येणार्‍या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आता पक्षाचं नेतृत्व करणार आहे.काँग्रेस चे युवराज राहुल गांधी आता मोठ्या जबाबदारीसह 2014 च्या निवडणुकीत उतरणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात या चर्चेला आज पूर्णविराम लावण्यात आलंय. शिबिराची सुरूवात झाली तेंव्हापासून राहुल गांधींकडे कोणती जबाबदारी देण्यात येईल याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाचे सूत्र सोपवण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आज तर 2014 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र राहुल गांधी यांची निवड झाली ती थेट उपाध्यक्षपदी..सोनिया गांधी यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकाची खुर्ची राहुल गांधींना मिळालीय. शिबिरात संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी राहुल यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर काँग्रेसच्या सर्व सदस्य आणि जेष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय दिला. या प्रस्तावावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केलंय. राहुल गांधी यांनीही औपचारीकरित्या उपाध्यक्षपदाचा स्विकार सुद्धा केलाय. काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांनी अधिकृत घोषणा केली. राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या या निर्णयावर शुभेच्छा देण्यास नकार दिलाय. राहुल गांधी हे पहिल्यापासून काँग्रेसमध्ये नंबर 2 चे नेते आहे आणि आताही दुसर्‍याच क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांची निवड काही नवीन नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी दिलीय. आता 2014 च्या निवडणुकीत राहुल विरुद्ध नरेंद्र मोदी असं चित्र तयार होईल अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.