#राष्ट्रवादी

Showing of 3927 - 3940 from 4167 results
लोकलेखाच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये - मुख्यमंत्री

बातम्याJun 3, 2011

लोकलेखाच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये - मुख्यमंत्री

03 जूनमहाराष्ट्राच्या लोकलेखा समितीच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. विधानसभा अध्यक्षांबरोबर चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितलं. सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत लोकलेखा समितीच्या काही सदस्यांनी राजीनामा दिले होते.गेल्या वर्षभरापासून नाराज झालेल्या सदस्यांनी राजीनामा दिला आहे. एकूण 25 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये 20 सदस्य हे विधानसभेतील आहे तर 5 सदस्य विधानपरिषदेतील आहे. लोकलेखा समितीत काही पक्षांच्या सदस्य ही आहे. यामध्ये अध्यक्ष भाजपचे गिरीष बापट, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, शेकापच्या मिनाक्षी पाटील, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेना एकनाथ शिंदे, मनसेचे बाळा नांदगावकर तसेच विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दादा देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, विनोद तावडे भाजप, दिपक सावंत शिवसेना आदी सभासदांनी आपला राजीनामा दिला आहे.

Live TV

News18 Lokmat
close