#राष्ट्रवादी

Showing of 2601 - 2614 from 2672 results
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी

बातम्याMar 29, 2013

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी

29 मार्चजालना, पुणे, धुळे आणि आता अहमदनगर..राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात चार ठिकाणी कायदा हातात घेतलाय. राष्ट्रवादीच्या या वाढत्या दादागिरीचा प्रसाद दोनदा पोलिसांनाही बसला. पण राष्ट्रवादीकडेच गृहखातं असल्यामुळेच या गुंड कार्यकर्त्यांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये, असा आरोप आता होऊ लागला आहे. जालन्यात एका वृध्द महिलेला मारहाण, धुळयात सहपोलीस निरीक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला, पुण्यात सत्र न्यायलयाच्या वकीलावर जीवघेणा हल्लाआणि आता श्रीगोंद्यात पोलीसाला मारहाण...गेल्या सात दिवसांत राज्यात घडलेल्या या घटना. या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे या प्रत्येक हल्ल्यामागे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. पण चारही ठिकाणी या गुंडांना पडकण्यात पोलिसांना यश मिळू शकलं नाही. धुळ्यात पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे. 72 तास उलटल्यानंतर या मुलांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले असले, तरी चंद्रकांत सोनार मात्र अजूनही फरार आहेत धुळ्यातली घटना ताजी असतानाच.अहमदनगर जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. श्रीगोंदा तालुक्यात लोणी व्यंकय्यानाथ इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पोलिसाला मारहाण केलीय. दादा खामकर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पोलीस शबाल शेख यांना मारहाण केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान ही घटना घडली.पुण्यातले राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा मुलगा समीर याने मंगळवारी एक वकिलावर बानेर परिसरात हत्यारांनी हल्ला केला. वकील आशिष ताम्हणे संचेती हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये ऍडमिट उपचार घेत आहेत. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आशिष हेदेखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.जालन्यात वृद्ध महिलेवर हल्ला करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निसार पटेल यांना मंगळवारी पकडण्यात आलंय आणि पोलीस कोठडीही देण्यात आली. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी राज्यभर वाढताना दिसतेय. आणि आपल्याच पक्षाच्या गुंडांना चाप लावण्याचं आव्हान आता गृहमंत्री आर आर पाटील यांच्यासमोर आहे.

Live TV

News18 Lokmat
close