#राष्ट्रपती

Showing of 131 - 143 from 143 results
'कलाम, मनमोहन सिंग,चटर्जी यांना राष्ट्रपती करा'

बातम्याJun 13, 2012

'कलाम, मनमोहन सिंग,चटर्जी यांना राष्ट्रपती करा'

13 जून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. आज दिल्लीत ममतादीदींच्या एंट्रीमुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला वेगळं वळणं मिळालं. सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांच्या नावाला दिलेलेल्या पसंतीला ममतादीदींनी केराची टोपली दाखवली आहे. ममतादीदी आणि मुलायम सिंग यांनी सोनियांच्या पसंतीला कडाडून विरोध केला. तर एपीजे अब्दुल कलाम,मनमोहन सिंग, सोमनाथ चटर्जी हे राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं जाहीर केलं. ममतादीदी आणि मुलायम सिंग यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक आणखी रंगात आणली.