News18 Lokmat

#राष्ट्रपती

Showing of 872 - 885 from 1046 results
भाजप-काँग्रेस यांच्यात चिखलफेक

बातम्याDec 30, 2011

भाजप-काँग्रेस यांच्यात चिखलफेक

30 जानेवारी, नवी दिल्लीराज्यसभेत गुरुवारी मध्यरात्री झालेल्या महानाट्यानंतर आज दिवसभर भाजप आणि सरकार यांच्यात जोरदार चिखलफेक झाली. तर संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन कालच्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. भाजपलाच हे विधेयक मंजूर करायचं नाही, असा आरोप त्यांनी केला. दुरुस्त्यांवर अभ्यास करण्यासाठी सरकारला वेळ हवा. अभ्यास करून संसेदच्या बजेट अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल, अस त्यांनी सांगितलं. भाजपनंही दुपारी पत्रकार परिषद घेतली. आणि सरकारवर तोफ डागली. सरकार मतदानापासून पळून गेलं. अशा पळपुट्या सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही, असं भाजपनं म्हटलं. कालचं नाट्य पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी रचल्याचा आरोप सुषमा स्वराज यांनी केला.भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री झाली. त्यात राज्यसभेतल्या कालच्या प्रकारावर विस्तारानं चर्चा झाली. सरकारविरोधी कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला. 3 जानेवारीला लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात भाजपचे खासदार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार आहेत. आणि सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. 3 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान लोकशाही बचाव आणि काँग्रेस हटाव ही मोहीमही राबवण्यात येणार आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी आज भाजपनं पंतप्रधान आणि सोनियांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. नैतिकतेच्या मुद्यावर सरकारनं पायऊतार व्हावं अशी मागणी भाजपनं केली.लोकायुक्त विधेयकाला भाजपने विरोध केला.आता हे विधेयक संसदेच्या बजेट अधिवेशनात सादर करण्यात येईल, असं संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी स्पष्ट केलंय. भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि लोकपाल विधेयक मंजूर करण्याची भाजपचीच इच्छा नसल्याचा आरोप केला.भाजपनंच खेळी खेळल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही केलाय. संसदेच्या पुढच्या अधिवेशनात म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकपाल विधेयक पुन्हा येईल, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची गरज नव्हती, असं केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलंय. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचं फक्त माझंच नाही तर संपूर्ण तरूणाईचं स्वप्नं होतं. असं काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी म्हटलं.राज्यसभेत काल जो काही प्रकार घडला त्यामागे कर्ताकरविता लालू प्रसाद यादव असल्याचं बोललं जातंय. पण लालू प्रसाद यादव यांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय.