#राष्ट्रपती

Showing of 573 - 586 from 594 results
प्रणवदांनी घेतली तेरावे राष्ट्रपती म्हणून शपथ

बातम्याJul 25, 2012

प्रणवदांनी घेतली तेरावे राष्ट्रपती म्हणून शपथ

25 जुलैमाजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज देशाचे तेरावे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्याआधी प्रणवदांनी सकाळी राजघाटवर जावून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहली. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी जावूनही श्रद्धांजली वाहली. भारताचे सरन्यायाधीश न्या. कापडिया यांनी प्रणवदांना गोपनीयतेची शपथ दिली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंह, लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्यासह केंद्रीय मंत्री व खासदार उपस्थित होते.

Live TV

News18 Lokmat
close