#राम मंदिर

Showing of 79 - 92 from 326 results
SPECIAL REPORT: लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचं आधी सरकार फिर 'राम मंदिर'

बातम्याJun 15, 2019

SPECIAL REPORT: लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचं आधी सरकार फिर 'राम मंदिर'

मुंबई, 15 जून: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांसह उद्धव ठाकरे श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. श्रीरामच्या भक्तीत दंग झालेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित 18 खासदारांसह श्रीरामाचं दर्शन घेणार आहे. 'पहले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी दिली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब अयोध्येचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ठाकरे कुटुंबानं श्रीरामाचं दर्शन घेतलं होतं. तसंच उद्धव ठाकरेंनी गंगाआरतीही केली होती. राम मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती.